शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहनांसाठी दोन कोटींचा निधी; २०० जागांसाठी होणार भरती

By नारायण बडगुजर | Updated: October 21, 2022 17:42 IST

दामिनी पथकाला हिरवा झेंडा....

पिंपरी : शहर पोलीस दलासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यातील पोलीस भरतीत २०० जागा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी भरण्यात येतील. तसेच आयुक्तालयाला नवीन वाहनांसाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

पालकमंत्री पाटील यांचा शुक्रवारी पिंपरी-चिंचवड शहरात दौरा झाला. त्यावेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. शहर पोलीस दलाच्या अडचणी समजून घेऊन आढावा घेतला. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर आयुक्त डाॅ. संजय शिंदे, उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे, मंचक इप्पर, आनंद भोईटे, आमदार महेश लांडगे, माजी महापौर उषा ढोरे, महापालिकेचे माजी सभागृह नेते नामदेव ढाके, एकनाथ पवार उपस्थित होते. 

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी व मुख्यालयासाठीच्या जागांचे प्रस्ताव मार्गी लावण्यात येतील. तसेच सायबर पोलीस ठाणे मंजुरीसाठी देखील प्रयत्न केले जातील. 

चार कोटींची मागणीपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला आणखी वाहने पाहिजे आहेत. त्यासाठी चार कोटींच्या निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बैठकीत सांगितले. त्यानुसार वाहनांसाठी दोन कोटी रुपये देण्यात येतील, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. तसेच यावेळी गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला. शहर पोलीस दलातील मनुष्यबळ, गुन्हेगारीचे स्वरुप, सायबर क्राईम, गंभीर गुन्ह्यांतील तपास, पोलिसांची विशेष कामगिरी याबाबत सादरीकरण करण्यात आले.  

दामिनी पथकाला हिरवा झेंडापोलीस आयुक्तालयांतर्गत दामिनी पथकाची कार्यान्वित केले आहे. सहायक आयुक्तांच्या विभागस्तरावर हे पथक कार्यरत राहणार आहे. एका विभागासाठी तीन दुचाकी या पथकाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी २४ महिला कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थीनी तसेच महिलांची छेडछाड रोखण्यासाठी पथक सजग राहणार आहे. या पथकाला पोलीस आयुक्तालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवा झेंडा दाखविला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसchandrakant patilचंद्रकांत पाटीलpimpri-acपिंपरी