शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

बालेवाडी परिसरात तब्बल २५ हजार रुपयांना विकणार होते एक रेमडेसिविर इंजेक्शन; दोन भावांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 19:46 IST

बालेवाडी परिसरात एक जण रेमडेसिविर इंजेक्शन २५ हजार रुपयांना विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री करणार्‍या दोघा भावांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन आणि दुचाकी जप्त कली आहे.

प्रदीप देवदत्त लाटे (वय २५) आणि संदीप देवदत्त लाटे (वय २३, रा. बालेवाडी, मुळ रा. बेलुरा, जि़ बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बालेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली. 

बालेवाडी परिसरात एक जण रेमडेसिविर इंजेक्शन २५ हजार रुपयांना विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल आणि पथकाने बालेवाडी भागात सापळा लावला. त्यात प्रदीप लाटे याला पकडण्यात आले. त्याचा भाऊ संदिप लाटे हा त्यास औषधांबाबत व वितरकांबाबत असलेल्या ज्ञानाचा गैरवापर करुन स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन त्यालाही अटक करण्यात आली. औषध निरीक्षक जयश्री सवदती यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. 

ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.शहरात रेमडेसिविरची काळ्या बाजारात विक्री करण्यात येत असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार १० पथकांची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या कारवाईत ५ गुन्हे दाखल करुन ९ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ९ इंजेक्शन जप्त करण्यात आली आहे. या कारवाईसाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सहकार्य करण्यात आले. .......शहरात रेमडेसिविर इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री होत असल्यास नागरिकांनी त्वरीत पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याArrestअटक