विहिरीत सापडल्या दोन दुचाकी

By Admin | Updated: October 14, 2016 05:09 IST2016-10-14T05:09:48+5:302016-10-14T05:09:48+5:30

आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील शिवसंगम डेव्हलपर्सच्या जागेत असणाऱ्या विहिरीमध्ये दोन दुचाकी ग्रामस्थांना सापडल्या आहे. ग्रामस्थांनी दोन्ही दुचाकी बाहेर

Two bikes found in the well | विहिरीत सापडल्या दोन दुचाकी

विहिरीत सापडल्या दोन दुचाकी

वाघोली : आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील शिवसंगम डेव्हलपर्सच्या जागेत असणाऱ्या विहिरीमध्ये दोन दुचाकी ग्रामस्थांना सापडल्या आहे. ग्रामस्थांनी दोन्ही दुचाकी बाहेर काढल्यानंतर एक गाडी आव्हाळवाडी येथीलच असल्याचे समोर आले तर दुसऱ्या दुचाकीच्या मालकाचा तपास अद्यापही लागलेला नाही.
याबाबतीत माहिती अशी, की वाघोली-आव्हाळवाडी रस्त्यालगत विठाई वेअरहाऊसच्या समोर असणाऱ्या शिवसंगम डेव्हलपर्सच्या मोकळ्या जागेमध्ये एक विहीर आहे. सकाळी विहिरीचे मालक तुकाराम आव्हाळे यांनी रात्रभर मोटारीच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसले होते. सकाळी विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने मोटर बंद करण्यासाठी आलेल्या आव्हाळे यांना विहिरीमध्ये पांढऱ्या रंगाची दुचाकी पडलेली असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ काही ग्रामस्थांना बोलावून दोरीच्या साह्याने दुचाकी वर काढली.
एक दुचाकी काढल्यानंतर आणखी एक काळ््या रंगाची दुचाकी दिसली. दुसरी दुचाकीदेखील गळाच्या सहायाने तरुणांनी वर काढली. या वेळी विहिरीभोवती बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. संपूर्ण आव्हाळवाडी रस्त्यावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
परंतु शिंदे यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. विहिरीत दोन गाड्या सापडल्याचे समजल्यानंतर याठिकाणी ग्रामस्थांनी एकाच गर्दी केली होती. दुचाकी सापडल्यामुळे जीवितहानी झाली आहे की नाही याचा शोधही ग्रामस्थांनी घेतला परंतु तसे काही आढळून आले नाही. विहिरीत दुचाकी सापडल्याचे आश्चर्य वाघोली, आव्हाळवाडीसह परिसरातील नागरिकांमध्ये व्यक्त केले जात आहे.
(वार्ताहर)

Web Title: Two bikes found in the well