सोशल मीडियावर काेयते दाखवून दहशत पसरविणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:29+5:302021-09-06T04:14:29+5:30
पुणे : दहशत पसरविण्याच्या हेतूने सोशल मीडियावर कोयते दाखवून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. राहुल ...

सोशल मीडियावर काेयते दाखवून दहशत पसरविणाऱ्या दोघांना अटक
पुणे : दहशत पसरविण्याच्या हेतूने सोशल मीडियावर कोयते दाखवून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली.
राहुल मलाप्पा चौगुले (वय १९ रा. वाघोली) आणि रोहन अनिल देडगे (वय २४ रामटेकडी, वानवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून कोयता आणि पालघन जप्त करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर कोयते, तलवार, पालघन अशी घातक हत्यारे हातात घेवून व्हिडिओ बनविणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला देण्यात आले होते. त्यानुसार पालघन हातात घेवून व्हिडिओ बनूवन व्हायरल करणारा वाघोलीत बांधकाम साईटच्या मैदानामध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून राहुल चौगुले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पालघन जप्त करण्यात आली आहे.
दहशतीसाठी कोयता हातात घेऊन व्हिडिओ बनविणारा रामटेकडीमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने राहुल देगडे याला अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे (अतिरिक्त कार्यभार) भाग्यश्री नवटके, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.