रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:07 IST2021-05-03T04:07:12+5:302021-05-03T04:07:12+5:30

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या दोघांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. निखील बाबुराव जाधव (वय ...

Two arrested for blackmailing Remedesivir injection | रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्‍या दोघांना खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.

निखील बाबुराव जाधव (वय २४, रा. आंबेगाव पठार) आणि मयुर विजय चव्हाण (वय २२, रा. वराळे, तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ इंजेक्शन्स, मोबाईल, कार असा सव्वा आठ लाखांचा माल जप्त केला आहे.

खंडणी विरोधी पथकातील अंमलदार राजेंद्र लांडगे व विवेक जाधव यांना एक महिला तिच्या साथीदारांच्या मदतीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेमडेसिविर इंजेक्शन काळ्या बाजारात ३७ हजार रुपयांना विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी बनावट ग्राहक म्हणून पाठविले. निखील जाधव मयुर चव्हाण हे तीन इंजेक्शन १ लाख ५ हजार रुपयांना देण्यास तयार झाले. नवले पुलाजवळील स्टोनेक्स गॅलरी शोरुमसमोर ते इंजेक्शन घेऊन आले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना ही ३ इंजेक्शने त्यांच्या महिला साथीदाराने विकण्यासाठी दिल्याचे त्यांनी सांगितले.

अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदिप बुवा, अमंलदार मधुकर तुपसुंदर, राजेंद्र लांडगें, नितीन कांबळे, विवेक जाधव, अमर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Two arrested for blackmailing Remedesivir injection