खुनाच्या प्रयत्नातील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:08 IST2021-05-17T04:08:45+5:302021-05-17T04:08:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. सोमनाथ नेताजी वाडकर (वय २७, ...

Two arrested in attempted murder | खुनाच्या प्रयत्नातील दोघांना अटक

खुनाच्या प्रयत्नातील दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खुनाच्या प्रयत्नातील दोन आरोपींना खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. सोमनाथ नेताजी वाडकर (वय २७, रा. पर्वती पायथा) आणि शुभम उर्फ प्रसाद रंगनाथ देशमाने (वय २२, रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

खंडणीविरोधी पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, तरुणाच्या खुनाच्या प्रयत्नातील आरोपी धायरीत येणार असल्याची माहिती पोलीस नाईक राजेंद्र लांडगे आणि नितीन रावळ यांना मिळाली होती.

खंडणीविरोधी पथकाने धायरीत सापळा रचून सोमनाथ वाडकरला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार वडगाव बुद्रुक परिसरात असल्याची माहिती दिली. त्यानुसार पथकाने शुभम देशमानेला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, विवेक जाधव, विजय कांबळे, संजय भापकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Two arrested in attempted murder