अडीच वर्षांच्या चिमुरडीने आईसोबत शिखर कळसूबाई केले सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST2021-02-05T05:11:18+5:302021-02-05T05:11:18+5:30
महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चनाताई भोर - करंडे यांची ही कन्या. आईच्या गर्भात असतानाच शिवसंस्कार अंगिकारत होती. गरोदर महिन्यातील ७ ...

अडीच वर्षांच्या चिमुरडीने आईसोबत शिखर कळसूबाई केले सर
महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चनाताई भोर - करंडे यांची ही कन्या. आईच्या गर्भात असतानाच शिवसंस्कार अंगिकारत होती. गरोदर महिन्यातील ७ व्या महिन्यात जन्माला आलेली ही मुद्रा अतिशय हुशार आहे. पायल खेबडे( वय १३ वर्ष )आणि गिर्यारोहक रोहित जाधव यांनी देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त कोविड योद्धे आणि भारतीय जवानांना मानवंदना दिली. सोबत कॅमेरा मन सोमनाथ फंड, मचु शिर्के, गहिणी शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.अमोल जाधव,सुयश घेवरी ,प्रशांत करंडे यांनी मोहीम फत्ते करण्यासाठी बाकी नियोजन सांभाळले. आत्ता पर्यंत मुद्राने आईसोबत७ किल्ले सर केले आहेत. १२ जानेवारी जिजाऊ जयंतीनिमित्त मुद्राने शिवजन्मभूमीतील किल्ले निमगिरी सर करून मांसाहेब जिजाऊ यांना पारंपरिक वेशभूषा परिधान करून अभिवादन केले. मुद्रा सह्याद्री प्रतिष्ठानच्या प्रवेशद्वार सोहळ्यात सहभागी होऊन नेहमीच शिव मावळ्यां समोर शिवगर्जना देऊन चेतना प्रेरणा निर्माण करत असते.आतापर्यंत मुद्राने अडीच वर्षात किल्ले रायगड, शिवनेरी, जंजिरा, हडसर, निमगिरी, पद्मदुर्ग, नारायणगड असे किल्ले मुद्राने पायी सर केले आहेत. तिला नेहमीच आईचे मार्गदर्शन संस्कार मिळत आहेत.