आंतरजातीय विवाहासाठी आता अडीच लाखांचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2015 01:19 IST2015-10-31T01:18:44+5:302015-10-31T01:19:08+5:30
सामाजिक विषमता दूर होऊन समाजामध्ये समतेची भावना रुजावी, एकात्मता दृढ व्हावी, समाज एकसंध व्हावा, जातीपातीचे समूळ निर्मूलन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने

आंतरजातीय विवाहासाठी आता अडीच लाखांचे अनुदान
पुणे : सामाजिक विषमता दूर होऊन समाजामध्ये समतेची भावना रुजावी, एकात्मता दृढ व्हावी, समाज एकसंध व्हावा, जातीपातीचे समूळ निर्मूलन व्हावे यासाठी शासनाच्या वतीने एकात्मिक आंतरजातीय विवाह ही नवीन योजना सुरु केली असून, या योजनेतंर्गंत शासनाच्या वतीने नवदाम्पत्यास तब्बल अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
डॉ. आंबेडकर फाउंडेशन, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकारच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकात्मिक आंतरजातीय विवाह ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अडीच लाखांचे अनुदान देण्यात येणार असून, यातील सव्वा लाख संबंधित दाम्पत्याच्या संयुक्त नावाने धनादेशाद्वारे व ५० टक्के रक्कम सव्वा लाख पाच वर्षांसाठी दोघांच्या नावावर फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येणार आहे.
हे अनुदान मंजूर करण्याचे अधिकार केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व डॉ. आंबेडकर फाउंडेशनचे व्यवस्थापक यांना आहेत. परंतु यासाठी दरवर्षी राज्यातून केवळ ३३ अर्जच स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी संबंधित आमदार, खासदार, जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीने राज्य शासनद्वारे भारत शासनाकडे पाठविण्यात येणार आहेत.