पुणे : पुण्यातील पेठांचे आणि पेशवेकालीन इतिहासाचे अतुट नाते आहे. पेशवेकाळाशी असेच नाते सांगणारा नेणे घाट आजही शनिवार पेठेमध्ये अस्तित्वात आहे. या घाटावर वसलेल्या मंदिरांपैकी तब्बल २५२ वर्षे जुने ' कामेश्वर मंदिर' त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सजले आहे. गाभाऱ्यामध्ये सुंदरशी फुलांची आरास आणि मंदिराभोवती काढण्यात आलेल्या रांगोळीने मंदिराच्या सौंदर्यात भर घातली. हे मंदिर पेशवेकालीन असून हेमाडपंती शैलीचे पूर्ण दगडी बांधकाम आहे. पेशव्यांचे सरदार लेले यांनी याभागात घाट बांधला तसेच हे मंदिर बांधले. मंदिराचे दगडी प्रवेशद्वार आकर्षक असून महिरपी धाटणीचा नगारखाना विशेष आकर्षण ठरतो. मंदिराच्या आतमध्ये गोल आकाराचा मंडप असून गाभाऱ्याच्या मुखाशी सुर्यदेव आणि श्री विष्णूच्या देखण्या मुर्त्या आहेत. गाभाऱ्यामध्ये शिवलिंग असून आकाराने मध्यम परंतू तेवढेच देखणे आहे. या शिवलिंगावर चांदीचा मुखवटा चढविण्यात आला होता. यासोबतच गाभाºयात आणखी तीन देखण्या मुर्त्या आहेत. मधोमध नंदीवर आरुढ झालेले शंकर असून शंकराने पार्वतीला मांडीवर घेतलेले आहे. शिव-पार्वती विवाहानंतर निघालेली वरात दर्शविणारी ही मूर्ती आहे. तर उजव्या बाजूला कामेश्वरी देवीची मूर्ती आणि डाव्या बाजूला उजव्या सोंडेचा सिध्दीविनायक आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेसाठी सजले अडीचशे वर्ष जुने 'कामेश्वर मंदिर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 18:22 IST
. शिव-पार्वती विवाहानंतर निघालेली वरात दर्शविणारी ही मुर्ती आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेसाठी सजले अडीचशे वर्ष जुने 'कामेश्वर मंदिर'
ठळक मुद्देहेमाडपंती बांधकाम : उजव्या सोंडेच्या सिध्दी विनायकाची देखणी मूर्ती कामेश्वर मंदिरासोबतच नेणे घाटावर आणखीही पेशवेकालीन मंदिरे