खूनाचा प्रयत्न करून चार महिन्या पासून फरार दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:11 IST2021-04-04T04:11:41+5:302021-04-04T04:11:41+5:30

नारायणगाव पोलिस स्टेशन मध्ये १३ ऑक्टोबर २०२० ला गुन्हा दाखल झाला होता . त्या गुन्ह्यात यापूर्वी ६ आरोपी अटक ...

Two accused absconding for four months for attempted murder arrested | खूनाचा प्रयत्न करून चार महिन्या पासून फरार दोन आरोपींना अटक

खूनाचा प्रयत्न करून चार महिन्या पासून फरार दोन आरोपींना अटक

नारायणगाव पोलिस स्टेशन मध्ये १३ ऑक्टोबर २०२० ला गुन्हा दाखल झाला होता . त्या गुन्ह्यात यापूर्वी ६ आरोपी अटक करण्यात आले असून आणखीन ३ आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होते . फरारी आरोपी संतोष सुभाष झुटे (वय २२) (रा. कावळ पिंपरी , ता. जुन्नर) व वैभव शांताराम इसवे (वय ३०) (रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे )हे पंचतळे कावळ पिंपरी भागात येथे एका शेताचे कडेला झाडाखाली बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलीस त्या ठिकाणी गेले. पोलिसांना पाहून संतोष झुटे व वैभव इसवे हे पळू लागले असता पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडून अटक केली .

हि कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि पृथ्वीराज ताटे,पोलीस नाईक भीमा लोंढे पोलीस नाईक धनंजय पालवे ,पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे यांनी केली आहे.

Web Title: Two accused absconding for four months for attempted murder arrested