तरुणावर कोयत्याने वार करून लुटल्याप्रकरणी दोन फरार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:10 IST2021-07-26T04:10:42+5:302021-07-26T04:10:42+5:30

पुणे : रस्त्याने चालत असलेल्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत कोयत्याने वार करून २५ हजार रुपये लुटल्याप्रकरणी दोन फरार आरोपींना ...

Two absconding accused arrested for robbing a youth with a scythe | तरुणावर कोयत्याने वार करून लुटल्याप्रकरणी दोन फरार आरोपींना अटक

तरुणावर कोयत्याने वार करून लुटल्याप्रकरणी दोन फरार आरोपींना अटक

पुणे : रस्त्याने चालत असलेल्या तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत कोयत्याने वार करून २५ हजार रुपये लुटल्याप्रकरणी दोन फरार आरोपींना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी अटक केली. कोर्टाने त्यांना २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अक्षय शांताराम येवले (वय २३, रा. सुतारदरा) आणि दीनानाथ गोरक्षनाथ पवार (वय २२, रा. शास्त्रीनगर) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण तुकाराम कुडले (वय २९, रा. सुतारदरा) सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याबाबत दीपक रामभाऊ कोकरे (वय २२, रा. सुतारदार) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना १३ जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सुतारदरा येथील आंग्रे वाड्याजवळ घडली. घटनेच्या दिवशी तक्रारदार रस्त्याने चालत असताना आरोपी प्रवीण कुडले याने त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. त्या वेळी जोला उर्फ अक्षय येवले आणि सोन्या पवार यांनी तक्रारदाराला लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि खिशातील २५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे फिर्यादीत नमूद आहे. आरोपींना कोर्टात हजर केले असता, गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील बी. एन. पेटकर यांनी केली. कोर्टाने ती मान्य केली.

....

Web Title: Two absconding accused arrested for robbing a youth with a scythe