शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खेड पंचायत समितीच्या राजकारणात 'ट्विस्ट' ; उद्धव ठाकरेंचा शिवसेनेच्या सदस्यांना महत्वाचा आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:02 IST

राज्यात महाआघाडी सरकार असताना खेड तालुक्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

राजगुरूनगर : राज्यात महाआघाडी सरकार असताना खेड तालुक्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्षाने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीकडून शिवसेनेची भक्कम फळी फोडत वाघाला घायाळ करण्यात आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरेंनी खासदार संजय राऊत यांना 'खेड मोहिमे'वर पाठवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला गर्भित इशारा दिला होता. आता याच शिवसेनेच्या सभापतींवर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर बुधवारी मतदान होत आहे. याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या  सदस्यांना महत्वाचा आदेश दिला आहे. 

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात २४ मे रोजी भाजपाच्या विद्यमान उपसभापतीसह राष्ट्रवादी ४ आणि शिवसेनेच्या ६ अशा ११ सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. यानंतर ३१ मे रोजी मोठ्या पोलिस बंदोबस्तासह सभेचे पिठासीन अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी अविश्वास ठरावावर सभा घेऊन मतदान घेतल्यानंतर ११ विरोधात ३ असा ठराव मंजूर झाला होता. 

खेड पंचायत समितीच्या शिवसेनेच्या सदस्यांना शिवसेनेने व्हीप जारी केला आहे.सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात मंजुर झालेल्या अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान करू नये असा पक्षादेश शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष कार्यालयाकडून मिळाला आहे. शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी शिवसेनेच्या सदस्याना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे सदस्य काय भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात मंजुर झालेल्या अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फेर अविश्वास ठराव घेण्याचे २७ जुलैच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी बुधवारी (दि १८) रोजी अविश्वास ठरावाची सभा घेण्याबाबतचे आदेश जारी केले आहे. समितीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता या अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेच्या बहुमताला सुरुंग लागल्याने पक्षाच्या सभापती विरोधात शिवसेनेच्याच बंडखोरांनी केलेल्या गटबाजीने संपूर्ण तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले होते.  दरम्यान, सभापती भगवान पोखरकर यांनी अविश्वास ठरावाबाबत सहलीवर गेलेल्या सदस्यांना सिहंगड परिसरातील एका हॉटेलमध्ये चांगलाच राडा केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक झाली होती. त्यामुळे अविश्वास ठरावाच्या सभेला कारागृहातुन भगवान पोखरकर यांना पोलिस बंदोबस्तासह आणण्यात आले होते.

टॅग्स :KhedखेडShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण