अडीच लाखांचा गुटखा चिखली येथे जप्त
By Admin | Updated: September 23, 2014 06:53 IST2014-09-23T06:53:03+5:302014-09-23T06:53:03+5:30
बेकायदारीत्या साठविलेला अडीच लाखांचा गुटखा अन्नसुरक्षा विभागाने जप्त केला

अडीच लाखांचा गुटखा चिखली येथे जप्त
पिंपरी : बेकायदारीत्या साठविलेला अडीच लाखांचा गुटखा अन्नसुरक्षा विभागाने जप्त केला. ही कारवाई सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास देहू-आळंदी रस्त्यावरील चिखली येथील मोगा ट्रेडर्स येथे करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
दिनेश मांगिलाल चौधरी (वय २४), मांगिलाल नारायण चौधरी (वय ५४, दोघेही रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अन्नसुरक्षा अधिकारी दिलीप करंजखेले यांनी दिलेली माहिती अशी : चौधरी यांनी बेकायदारीत्या गुटखा व सुगंधित पानमसाला यांचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. चौधरीच्या मोगा ट्रेडर्स या दुकानाच्या गोदामात २ लाख ५० हजार ८५० रुपयांचा गुटखा, सुगंधित पानमसाल्याचा माल सापडला. दोघांवरही निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. कारवाई विभागाचे दिलीप करंजखेले, रवींद्र जेट्टे, अविनाश भांडवलकर, एस. पी. शिंदे, दिलीप संगत यांनी केली. (प्रतिनिधी)