विश्रांतवाडीत अडीच लाखांची घरफोडी

By Admin | Updated: March 22, 2017 03:23 IST2017-03-22T03:23:27+5:302017-03-22T03:23:27+5:30

बंद सदनिका फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. ही घरफोडी

Twenty-two lakhs of burglary in Vishrantwadi | विश्रांतवाडीत अडीच लाखांची घरफोडी

विश्रांतवाडीत अडीच लाखांची घरफोडी

पुणे : बंद सदनिका फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. ही घरफोडी मागील महिन्यात झाली असली, तरी काही दिवसांपूर्वी हा प्रकार समोर आला. याप्रकरणी सुहास नेवासकर (वय ६०, रा. विद्यानगर, विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ ते २५ फेब्रुवारी या दरम्यान ही घटना घडली आहे. या काळात नेवासकर हे काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटामधून रोख ५ हजार, सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण २ लाख ५४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. नेवासकर घरी आल्यानंतर, त्यांना घरफोडी झाल्याचे समजले.

Web Title: Twenty-two lakhs of burglary in Vishrantwadi