मिळकतकराचा तिप्पट दंड रद्द
By Admin | Updated: December 12, 2014 00:05 IST2014-12-12T00:05:10+5:302014-12-12T00:05:10+5:30
पालिकेकडून भोगवटापत्र तसेच पूर्णत्वाचा दाखल न घेता इमारतीचा वापर सुरू करणा:या नागरिकांना पालिकेकडून तीनपट दराने मिळकतकर आकारला जातो.

मिळकतकराचा तिप्पट दंड रद्द
पुणो : पालिकेकडून भोगवटापत्र तसेच पूर्णत्वाचा दाखल न घेता इमारतीचा वापर सुरू करणा:या नागरिकांना पालिकेकडून तीनपट दराने मिळकतकर आकारला जातो. अनेकदा बांधकाम व्यावसायिकांनी पूर्णत्वाचा दाखला न घेतल्याने किंवा कायदेशीर बाबींमुळे हा भरुदड नागरिकांना सहन करावा लागतो. बांधकाम व्यावसायिकांनी पालिकेच्या परवानगीनुसार बांधकाम केलेले असेल; मात्र पूर्णत्वाचा दाखला आणि भोगवटापत्र घेतले नसेल तर अशा नागरिकांना एकपट दरानेच कर आकारण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी आज दिली.
महापालिकेची परवानगी न घेता बेकायदा बांधकाम करणा:यांबरोबरच पालिकेकडून पूर्णत्वाचा दाखला तसेच भोगवटापत्र न घेतलेल्या नागरिकांकडून तीनपट मिळकतकर वसूल करण्याचा निर्णय महापालिकेचे तत्कालीन आयुक्त महेश झगडे
यांनी 2क्क्8 मध्ये घेतला होता. पालिकेकडून घेतला जाणारा दंड अन्यायकारक असल्याने हा दंड रद्द करावा, असा प्रस्ताव नगरसेवक विशाल तांबे व अप्पा रेणुसे यांनी पालिका आयुक्तांना काही दिवसांपूर्वी दिला होता.
पालिकेच्या विधी विभागाबरोबर याविषयी चर्चा करून हा दंड रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सांगितले. तसेच 2क्क्8 नंतर ज्या मिळकतींना तीनपट दंड आकारण्यात आला आहे, त्यांचे बांधकामही नियमित असल्यास त्यांनाही या आर्थिक वर्षाच्या करात सवलत देण्यात येणार असून, त्यांनी तीनपट दंड भरला असल्यास पुढील वर्षाच्या करातून तो वळता करून घेतला जाणार आहे.
पालिकेने 15 नागरिकांकडून तीनपटीने कर आकारणी केल्याचे ते म्हणाले. या निर्णयामुळे नागरिकांना कर लावून घेणो सोयीस्कर होणार असल्याने पालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
1बांधकाम विभागाने बांधकाम नकाशास परवानगी देऊन काम चालू करण्याचा दाखला (कमिन्समेंट सर्टिफिकेट) दिल्यानंतर, जोते तपासणी दाखला मिळाला असल्यास (प्लिंथ चेक) आणि करण्यात आलेले बांधकाम महापालिकेस सादर करण्यात आलेल्या नकाशानुसार असल्यास ज्या व्यक्तीने सदर घराचा वापर सुरू केला असल्यास अशा व्यक्तीस राहण्यास गेलेल्या आर्थिक वर्षाच्या दरानुसार, करआकारणी एकपटीने केली जाईल. मात्र, त्या मिळकतधारकास मंजुरीप्रमाणोच असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
2यापूर्वी ज्या मिळकतींना बांधकाम चालू करण्याचा दाखला मिळाला आहे; मात्र त्यानंतर तीनपट करआकारणी करण्यात आलेली आहे, त्यांनी आपला कर 31 मार्च 2क्14 पूर्वी भरल्यानंतर, त्यांना कर विभागास अर्ज करून बांधकाम विभागाचे मंजूर नकाशाप्रमाणोच बांधकाम असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना चालू वर्षापासून एकपट दराने करआकारणी केली जाईल. तसेच त्यांनी चालू आर्थिक वर्षाची तीनपट रक्कम भरली असल्यास त्यांनी ती पुढील वर्षाच्या करात वळती केली जाईल.
3संबंधित मिळकतधारकास कमिन्समेंट सर्टिफिकेट दिले असल्यास तसेच जोते तपासणी दाखलाही मंजूर झालेला आहे. मात्र, मान्य नकाशा व्यतिरिक्त
जादा बांधकाम असल्यास मात्र, ते बांधकाम विभागाच्या नियमानुसार, नियमित होणार
असल्यास अशा मिळकतधारकांनाही सवलत मिळणार आहे.