सव्वा लाखांचे मेफेड्रोन जप्त

By Admin | Updated: October 30, 2015 00:28 IST2015-10-30T00:28:37+5:302015-10-30T00:28:37+5:30

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सव्वा लाखांचे मेफेड्रोन जप्त केले असून, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय युवकाला न्यायालयाने ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत

Twenty lakhs of mafedron seized | सव्वा लाखांचे मेफेड्रोन जप्त

सव्वा लाखांचे मेफेड्रोन जप्त

पुणे : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सव्वा लाखांचे मेफेड्रोन जप्त केले असून, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय युवकाला न्यायालयाने ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी त्याच्याकडून ११२ ग्रॅम मेफेड्रॉन, छोटा डिजिटल वजनकाटा, छोट्या ५० रिकाम्या पिशव्या, रोख ३०० रुपये असा २ लाख २४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक श्रीकांत नवले यांनी दिली.
राहुलकुमार नरसिंग सिंह (वय २८, रा. उबाळेनगर, वाघोली, मूळ उत्तर प्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार अविनाश शिंदे यांना खबऱ्यामार्फत आरोपीची माहिती मिळाली होती. त्यानुसार नवले यांच्यासह सहायक निरीक्षक अजय वाघमारे, सुरेश साळी, अविनाश शिंदे, ज्ञानदेव घनवट, रामदास जाधव, विनायक जाधव, प्रफुल्ल साबळे, रामचंद्र यादव, कुणाल माने, विठ्ठल खिलारे, नितीन सानप, राजेंद्र बारशिंदे, सचिन चंदन, संगीता जाधव यांनी बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास खराडी येथील समर्थनगरकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला.
राहुलकुमार याला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडील माल जप्त केला होता. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Twenty lakhs of mafedron seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.