दौंडमध्ये स्वखर्चाने बसवले वीस बेंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:14 IST2021-08-19T04:14:40+5:302021-08-19T04:14:40+5:30
या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष विलास शितोळे, जीवराज ...

दौंडमध्ये स्वखर्चाने बसवले वीस बेंच
या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपनगराध्यक्ष विलास शितोळे, जीवराज पवार, मोहन नारंग, गौतम साळवे, वसीम शेख, राजेश गायकवाड, संजय चितारे, आनंद पळसे, अनिल जगताप, नरेश डाळींबे, ज्ञानेश्वर मुळे, आबा वाघमारे, गणेश दळवी उपस्थित होते.
वीरधवल जगदाळे म्हणाले की, प्रभाग क्रमांक चारमध्ये बसविण्यात आलेल्या बेंचचा ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी उपयोग होणार आहे. तसेच या सर्व बेंचच्या परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे राहील. इंद्रजित जगदाळे म्हणाले की, प्रभाग क्रमांक चारमध्ये बऱ्यापैकी विकासकामे झाली आहे. मात्र, विठ्ठल मंदिर ते गाववेश यासह काही रस्त्यांची कामे स्थायी समितीची सभा वेळेत झाली नाही म्हणून रखडलेली आहे. मात्र रखडलेली विकासकामे तातडीने होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
१८ दौंड
दौंड येथील प्रभाग क्रमांक चारमध्ये बेंच बसविणे उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवर.