मंचर: येथून जवळ असणाऱ्या तांबडेमळा गावच्या हद्दीत मंचर पोलिसांच्या कारवाईत १२ लाख २० हजार रुपये किमतीचे सहा हजार किलो गोमास, ४ लाख रुपये किमतीचा टेम्पो मंचर पोलिसांनी जप्त केला आहे. मंचर पोलीसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस जवान मंगेश लोखंडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : आयशर टेम्पोमध्ये संगमनेर येथून मुंबईकडे गोमास विक्रीसाठी जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ही माहिती मंचर पोलीस ठाण्यात दिली. पुणे नाशिक महामार्गावरील तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मंचर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सहा टन गोमांस जप्त केले आहे. टेम्पोत अंदाजे सहा हजार किलो वजनाचे गोमास भरून संगमनेरहून मुंबईला नेले जात होते. ही कारवाई दरम्यान बजरंग दलाचे कार्यकर्ते महेश थोरात, सचिन पठारे, सुरज धरम, कौस्तुभ सोमवंशी, अक्षय चिखले, श्रीराम शिरसागर, शुभम गवळी, सागर रेणुकादास यांच्या मदतीने करण्यात आली. या कारवाई दरम्यान पोलीस या वाहनाचा पाठलाग करत असताना पुणे-नाशिक महामार्गावर तांबडेमळा जवळ चालक टेम्पो सोडून फरार झाला आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहे. याप्रकरणी अनोळखी वाहन चालकाविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.