बाराशे किलोमीटर अवघ्या ९० तासांत

By Admin | Updated: September 14, 2015 04:53 IST2015-09-14T04:53:07+5:302015-09-14T04:53:07+5:30

मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कसोटी पाहणारी ‘पॅरिस- ब्रेस्ट-पॅरिस’ सायकल शर्यत पुण्यातील ४ सायकलप्रेमींनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

In twelve hours, 90 hours in just 9 0 hours | बाराशे किलोमीटर अवघ्या ९० तासांत

बाराशे किलोमीटर अवघ्या ९० तासांत

मिलिंद कांबळे, पिंपरी-चिंचवड
मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कसोटी पाहणारी ‘पॅरिस- ब्रेस्ट-पॅरिस’ सायकल शर्यत पुण्यातील ४ सायकलप्रेमींनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अवघ्या ९० तासांत १ हजार २३० किलोमीटर अंतराचा प्रवास करून त्यांनी विक्रम प्रस्थापित केला आहे.
अ‍ॅडॉक्स क्लब पॅरिसियनमार्फत गेल्या महिन्यात ही स्पर्धा पॅरिस (फ्रान्स) येथे झाली. चार वर्षांतून एकदा होणारी ही खडतर सायकल स्पर्धा जगात प्रसिद्ध आहे. ही स्पर्धा म्हणजे सायकलपटूंच्या शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीची परीक्षा मानली जाते. कारण, स्पर्धेचा संपूर्ण मार्ग डोंगराळ असतो. एक डोंगर उतरला, की समोर दुसरा डोंगर उभाच, असे असंख्य डोंगर चढावे-उतरावे लागतात.
या स्पर्धेत जगभरातील ६ हजार स्पर्धकांना प्रवेश मिळाला होता. भारतातून सहभागी झालेल्या ५५ पैकी २० स्पर्धक यशस्वी ठरले. २०११ च्या स्पर्धेत १५ पैकी केवळ मुंबईचे कैलास पाटील यांनी शर्यत पूर्ण केली होती.
पुण्यातून ११ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांत हिरेन पटेल, अपूर्व वर्मा, डॉ. बबन डोळस आणि डॉ. प्रकाश दुबे-पाटील या चौघांनी शर्यत पूर्ण करून विक्रमी कामगिरी नोंदवली. थंडी, पावसाची रिपरिप व निसरडे रस्ते अशा प्रतिकूल वातावरणात ही सायकलची चढाई होती. एकूण शर्यतीत ३६ हजार फूट उंची गाठली गेली. मार्गावरील १९ चेकिंग पॉर्इंटवर वेळेत न पोहोचल्यास शर्यतीतून बाद होण्याच्या भीतीने सर्वांनाच तेथे वेळेत रिपोर्टिंगची कसरत करावी लागत होती. प्रत्येक ठिकाणी मासांहारी पदार्थ असल्याने आहाराची गैरसोय झाली. चहा किंवा कॉफीसोबत ब्रेड, केळी, सफरचंद आणि पाण्यातून इलेक्ट्रॉल पावडर घेऊन या स्पर्धकांनी आपली भूक भागविली. झोप न घेता दिवस-रात्र केवळ सायकल चालविल्याने शारीरिक क्षमतेबरोबर मानसिक खच्चीकरणही होत होते.

Web Title: In twelve hours, 90 hours in just 9 0 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.