शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

जुन्नर परिसरात दोन महिन्यांमध्ये बारा बछडे पुन्हा आईच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 16:31 IST

उसाच्या शेतात आढळतात बछडे

ठळक मुद्देवन विभाग व ‘वाइल्ड लाइफ एसओएस’ला यश

पुणे: जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा अधिवास आता उसाची शेती बनली आहे. त्यामध्ये प्रजनन झाल्यावर बछडे आढळून येतात. ऊस काढताना तर हमखास बछडे दिसून येतात. या बछड्यांना पुन्हा त्यांच्या आईच्या कुशीत सोडण्यात येते. गेल्या दोन महिन्यांत सुमारे १२ बछडे आपल्या आईकडे गेली असून, हे काम वन विभाग आणि वाइल्डलाइफ एसओएस संस्थेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, ओतूर वनपरिक्षेत्रातील बोरी गावात शुक्रवारी दोन महिन्यांचा बछडा सापडला होता. त्याला देखील रात्री रेस्क्यू टीमने त्याच्या आईकडे सुरक्षित सोपविण्यास मदत केली.

नुकतेच जुन्नर तालुक्यातील वडगाव साहनी गावातील उसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळले होते. स्थानिक नागरिकांनी लगेच त्याची माहिती वन विभागला कळविली होती. त्यानंतर वनअधिकारी आणि वाइल्डलाइफ एसओएसच्या रेस्क्यू टीमने येथील बछड्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर  बछड्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रात नेले. पशुवैद्यकीय अधिकारी डॅा. निखिल बनगर यांनी तिन्ही बछड्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात दोन नर व एक मादी होती. त्यांचे वय साधारण पंधरा दिवसांचे होते. ते दिसायला अतिशय हेल्दी होते. त्यामुळे या बछड्यांना त्यांच्या आईकडे पाठविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. ज्या ठिकाणाहून या बछड्यांना ताब्यात घेतले होते. त्या ठिकाणी परत त्यांना सोडण्यात येण्याचे ठरले. त्यासाठी एका खोक्याचा वापर केला. त्या खोक्यात बछड्यांना ठेवले. पहिल्या रात्री तिथे बिबट्या आला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी प्रयत्न केला. तेव्हा त्या बछड्यांची आई तिथे आली. तिने एक-एक करत बछड्यांच्या मानेला अलगद पकडत सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. 

वाइल्डलाइफ एसओएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण म्हणाले की, सध्या बिबट्यांचा अधिवास असणारे नैसर्गिक जंगल कमी होत आहे. त्यामुळे ते उसाच्या फडात राहत आहेत. त्यामध्ये प्रजनन होतात. मग  ऊसतोड करताना बछडे आढळून येतात. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करत असताे.

आम्ही गेल्या दोन महिन्यात १२ बछडे आईच्या कुशीत पोचविण्याचे काम केले आहे. त्यासाठी अनेकदा प्रयत्न करावा लागतो. या वेळी दुसऱ्या प्रयत्नात बछड्यांची आई आली आणि त्यांना घेऊन गेली.

                                                                                                                    -  योगेश घोडके, वनाधिकारी, जुन्नर  

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्याforestजंगल