दौंडमध्ये हुतात्मा एक्स्प्रेस लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न

By admin | Published: January 10, 2017 02:44 AM2017-01-10T02:44:53+5:302017-01-10T02:44:53+5:30

दौंड-भिगवण रेल्वे मार्गावर रविवारी रात्री पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; अन्यथा रात्रीच्या

Tunda tried to rob the Hutatma Express in Daund | दौंडमध्ये हुतात्मा एक्स्प्रेस लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न

दौंडमध्ये हुतात्मा एक्स्प्रेस लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न

Next

दौंड : दौंड-भिगवण रेल्वे मार्गावर रविवारी रात्री पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस ही गाडी लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला; अन्यथा रात्रीच्या सुमारास प्रवाशांची मोठी लूटमार झाली असती. दरम्यान, रेल्वे सिग्नलची केबल वायर तोडून रेल्वे थांबवण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.
दौंडहून सोलापूरला निघालेली हुतात्मा एक्स्प्रेस बोरीबेल (ता. दौंड) येथील स्थानकाच्या होम सिग्नलजवळ आली असता गाडी हळू झाली. या वेळी या गाडीतून प्रवास करणाऱ्या तेजस्विनी कुलकर्णी (वय २२, रा. कर्णिकनगर, सोलापूर) या खिडकीजवळ होत्या. यांच्या हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने हाताला हिसका मारून पळवून नेला. सुदैवाने त्यांच्या हातात असलेली पर्स चोरट्यांच्या हाती लागली नाही. त्यानंतर गाडी सुरू झाल्याने पुढील अनर्थ टळला.
दौंड ते भिगवणदरम्यान रेल्वेत चोरीचे आणि प्रवाशांच्या लुटमारीचे प्रकार घडलेले असतानादेखील याकडे रेल्वे सुरक्षा यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार प्रवाशांची आहे.

Web Title: Tunda tried to rob the Hutatma Express in Daund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.