धरणे तुडुंब!
By Admin | Updated: September 11, 2014 04:30 IST2014-09-11T04:30:38+5:302014-09-11T04:30:38+5:30
बुधवारी सकाळपासून खडकवासला धरणातून सुमारे साडेसात हजार क्युसेक्स पाणी मुठा नदीत सोडण्यात येत होते

धरणे तुडुंब!
पुणे : बुधवारी सकाळपासून खडकवासला धरणातून सुमारे साडेसात हजार क्युसेक्स पाणी मुठा नदीत सोडण्यात येत होते. रात्री हा विसर्ग अडीच हजार क्युसेक्सने सुरू होता. दरम्यान, या प्रकल्पातील चारही धरणांमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे.
गेल्या आठवड्यापासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगली हजेरी लावल्याने या प्रकल्पातील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून या धरणांमधून विसर्ग सुरू आहे. आज दिवसभरात पानशेत धरणातून १५३२, वरसगाव धरणातून २३००, तर टेमघर धरणातून ३२२ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. दुपारी तीननंतर हा विसर्ग बंद करण्यात आला. (प्रतिनिधी)