शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Tukaram Supe: शालार्थ आयडीतूनही तुकाराम सुपेने केली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 15:32 IST

सुपेकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं

पुणे: TET Exam Scam: राज्य शासनातर्फे शिक्षकांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिक्षकांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मान्यता मिळाल्यानंतर वेतन सुरु करण्यासाठी शालार्थ आयडी घ्यावा लागतो. कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना शालार्थ आयडी देण्याचे काम परीक्षा परिषद आयुक्त आणि पुणे विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष तुकाराम सुपे (tukaram supe) याच्याकडे होते. शालार्थ आयडी मिळवण्यासाठी अनेक शिक्षक पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या खेटा मारत होते. परंतु, चिरीमिरी घेतल्याशिवाय शालार्थ आयडी क्रमांक मिळत नव्हता. त्यामुळे सुपे याने टीईटी परीक्षेसह (TETExam scam) शालार्थ आयडी देण्याच्या प्रक्रियेतूनही लाखोंची कमाई केली आहे, असे काही शिक्षकांनी सांगितले.

पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाला सील ठोकण्यात आले आहे. त्यामुळे येथील काही कागदपत्र तपासल्यास त्यातून शालार्थ आयडी प्रकरणाचे धागेदोरे मिळू शकतात. तसेच शालार्थ आयडी देण्याचे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केल्यास सुपेबरोबर गंगाजळी जमा करण्यात आणखी कोण कोण होते. हे असे समोर येऊ शकते, असेही सुत्रांनी सांगितले.

तब्बल पाचशे उमेदवारांचे निकाल बदलले-

पोलिसांनी ज्या आरोपींना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली आहे. या आरोपींनी तब्बल पाचशे उमेदवारांचे निकाल बदलले आहेत. त्यासाठी त्यांनी पाच कोटींचा व्यवहार केला असल्याची शक्यता आहे. सैन्य भरती, म्हाडा, टीईटी या परीक्षांत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात मोठं रॅकेट समोर येत असल्याने खळबळ माजली आहे. 

पुणे पोलिसांनी यापूर्वी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे आयुक्त तुकाराम सुपेला (tukaram supe) अटक केली होती. सुपेकडून सुरुवातीला ९० लाखांचं तर नंतर २ कोटींचं घबाड पोलिसांनी जप्त केलं होतं. त्यानंतर आज प्रकरणात पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. ही माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडexamपरीक्षाEducationशिक्षण