मंगळवारी २४६ बाधित, तर ३५१ रुग्ण झाले बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:12 IST2021-06-16T04:12:32+5:302021-06-16T04:12:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरात मंगळवारी दिवसभरात २४६ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३५१ रुग्ण बरे झाले ...

On Tuesday, 246 were infected and 351 were cured | मंगळवारी २४६ बाधित, तर ३५१ रुग्ण झाले बरे

मंगळवारी २४६ बाधित, तर ३५१ रुग्ण झाले बरे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात मंगळवारी दिवसभरात २४६ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ३५१ रुग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ४८३ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा २ हजार ७७३ झाला आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ७३६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १० मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ४९२ झाली आहे. पुण्याबाहेरील ११ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ३५१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार २८० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७४ हजार ५४५ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ७७३ झाली आहे.

-------------

दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ४ हजार ७४८ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २५ लाख ८६ हजार ९६२ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.

पुण्यातील कोरोनास्थिती

आज बाधित रुग्ण - २४६

आज घरी सोडले - ३५१

एकूण बाधित रुग्ण - ४,७४,५४५

सक्रिय रुग्ण - २,७७३

आजचे मृत्यू - १०

एकूण मृत्यू - ८,४९२

Web Title: On Tuesday, 246 were infected and 351 were cured