सेवानिवृत्त सैनिकांचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:09 IST2021-03-15T04:09:53+5:302021-03-15T04:09:53+5:30

माजी सैनिक विकास सेवा संस्था भोर, वेल्हा तर्फे आयोजित निवृत्त झालेल्या सैनिकांचा व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजयी झालेल्या माजी सैनिकांचे ...

Trying to solve the problems of retired soldiers | सेवानिवृत्त सैनिकांचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशील

सेवानिवृत्त सैनिकांचे प्रश्न सोडवण्यास प्रयत्नशील

माजी सैनिक विकास सेवा संस्था भोर, वेल्हा तर्फे आयोजित निवृत्त झालेल्या सैनिकांचा व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजयी झालेल्या माजी सैनिकांचे सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब समगीर होते. तर प्रमुख उपस्थितांमध्ये माजी सैनिक तथा सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार, संस्थेचे सर्व संचालक, सैनिकांच्या विधवा पत्नी प्राचार्य मोहन ताकवले आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात ३५ सेवानिवृत्तांचा व तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच व सदस्य म्हणून निवड झालेल्यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते शाल श्रीफळ ,स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात संस्थेने आजपर्यंत माजी सैनिकांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करुन मिळवलेल्या योजनांचा अहवाल नानासो समगीरा यांनी सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक बोडके यांनी केले.तर आभार संस्थेचे सहसचिव संपतराव कोंडे यांनी मानले.

Web Title: Trying to solve the problems of retired soldiers