जास्तीत जास्त मताधिक्यासाठी प्रयत्न
By Admin | Updated: February 17, 2017 05:17 IST2017-02-17T05:17:56+5:302017-02-17T05:17:56+5:30
विकासकामे ही अनिल टिंगरे यांची ताकद असून, या विकासकामांवरच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे.

जास्तीत जास्त मताधिक्यासाठी प्रयत्न
येरवडा : विकासकामे ही अनिल टिंगरे यांची ताकद असून, या विकासकामांवरच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे. पाण्याची टाकी, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, विरंगुळा केंद्र, उद्याने, भाजी मंडई, मुबलक पाणी, एलईडी लाईट, मुख्य आणि अंतर्गत सिमेंट-काँक्रीटचे रस्ते अशा महत्त्वाच्या कामांबरोबरच अनेक मूलभूत सुविधा या प्रभागात अनिल (बॉबी) टिंगरे यांच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांत पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मताधिक्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी सांगितले.
कळस, धानोरी प्रभाग क्र. १ मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनिल (बॉबी) टिंगरे, मारुती (नाना) सांगडे, अलका अविनाश खाडे व किरण नीलेश जठार यांनी आज मुंजाबावस्ती परिसरात पदयात्रा काढून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या या भागातील नागरिकांकडून उमेदवारांचे उत्साहात स्वागत केले जात होते. या पदयात्रेत उमेदवारांबरोबरच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. मुबलक पाणीपुरवठा, समाजमंदिर, व्यायामशाळा, अंतर्गत रस्ते डांबरीकरण, सोलर पथदिवे, एलईडी लाईट, विजेच्या वाहिन्या भूमिगत करणे, रोड रिफ्लेक्टर आदी विकासकामे या भागात केली आहेत. त्यामुळे नागरिक अनिल (बॉबी) टिंगरे यांच्या कामावर समाधानी असल्याने येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजय मिळेल, यात काहीही शंका नसल्याचा आत्मविश्वास उमेदवार व्यक्त करीत होते.