वनगळी येथे सुनेस जीवे मारण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: February 20, 2016 01:01 IST2016-02-20T01:01:38+5:302016-02-20T01:01:38+5:30

सासऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या २३ वर्षे वयाच्या सुनेच्या डोक्यात घरगुती गॅस सिलिंडरची टाकी मारून, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न सासरच्या मंडळींनी केल्याची घटना वनगळी

Trying to kill suns in the forest | वनगळी येथे सुनेस जीवे मारण्याचा प्रयत्न

वनगळी येथे सुनेस जीवे मारण्याचा प्रयत्न

इंदापूर : सासऱ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या २३ वर्षे वयाच्या सुनेच्या डोक्यात घरगुती गॅस सिलिंडरची टाकी मारून, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न सासरच्या मंडळींनी केल्याची घटना वनगळी (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. १७) घडली.
या संदर्भात काल इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित विवाहितेच्या पतीला अटल करण्यात आली आहे. विवाहितेची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यात ससून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कुमार बबन आदमाने, बबन सदाशिव आदमाने, सुमन बबन आदमाने, पिंटू भगवान बलाडे, भगवान बलाडे (सर्व रा. गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. खेड (उस्मानाबाद) येथील रहिवासी असणाऱ्या या युवतीचे कुमार आदमाने याच्याशी ७ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिचा सासरी छळ होत होता. सासरा बबन सदाशिव आदमाने याच्याशी शारीरिक संबंध ठेवावा, असा दबाव घरच्यांकडून येत होता. त्यास कंटाळून ती माहेरी निघून गेली होती. ५ महिन्यांपूर्वी नवऱ्याने आम्ही वेगळे राहतो, असे सांगून तिला परत नांदायला आणले होते. वनगळी येथील ताहेर शेख यांच्या शेतातील घरात ते दोघे राहात होते. एक महिन्यापासून परत सासरच्या मंडळींनी त्याच कारणासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. यास तीने नकार दिल्याने आरोपींनी तिच्या डोक्यावर सिलिंडरची टाकी मारून तिला गंभीर जखमी केले.

Web Title: Trying to kill suns in the forest