शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

गुटखा तस्कराकडून ‘अन्न औषध’च्या अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: January 24, 2017 00:09 IST

शिवडेतील घटना : अपघातग्रस्त कारमध्ये होता १२० पोती गुटखा; संशयित पसार

कऱ्हाड/उंब्रज : अपघातग्रस्त कारमध्ये पोलिसांना २ लाख ७० हजार रुपये किमतीची गुटख्याच्या पुड्या भरलेली तब्बल १२० पोती आढळून आली. पोलिसांनी ती जप्त करून आरोपीसह मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला. गुटखा तस्करांनी ‘अन्न व औषध’च्या अधिकाऱ्याला कारमधून खाली ढकलून चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी व अन्य दोघेजण गुटख्याने भरलेल्या गाडीसह पसार झाले. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील शिवडे हद्दीत सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली.ओमप्रकाश वीरभाराम बिष्णोई (रा. बिबेवाडी, पुणे) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड शहर गुंजवटे, सहायक निरीक्षक संतोष चौधरी यांच्यासह पथक रविवारी रात्री गस्त घालत होते. मध्यरात्री एकच्या सुमारास हे पथक कोल्हापूर नाका परिसरात असताना साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या कारचा (एमएच १२ एलव्ही ५७५६) टायर फुटल्याने कार दुभाजकाला धडकून अपघातग्रस्त झाली. घटना निदर्शनास येताच पोलिस पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी कारचा चालक ओमप्रकाश बिष्णोई याला कारमधून खाली उतरवले. तसेच कारची पाहणी केली. त्यावेळी कारमध्ये गुटख्याच्या पुड्या भरलेली तब्बल १२० पोती आढळून आली. पोलिसांनी चालक बिष्णोई याच्यासह संबंधित कार ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात आणली. कायदेशीर कार्यवाही पार पडल्यानंतर शहर पोलिसांनी या कारवाईची माहिती साताऱ्याच्या अन्न व औषध प्रशासनला दिली. सकाळी अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे, राहुल खंडागळे व नमुना सहायक सुनील सर्वगोड असे तिघेजण कऱ्हाडला दाखल झाले. त्यांनी जप्त केलेल्या गुटख्याचा पंचनामा केला. तसेच आरोपी बिष्णोई याच्यासह संबंधित गुटखा ताब्यात घेतला. गुटखा व आरोपीला साताऱ्याला नेण्यासाठी खासगी कारची आवश्यकता होती. त्यावेळी आरोपी बिष्णोई यानेच त्याच्या एका मित्राला कार (एमएच १४ एफएक्स ७१२४) घेऊन पोलिस ठाण्यात बोलवले. काही वेळानंतर संबंधित मित्र व अन्य एकजण कार घेऊन पोलिस ठाण्यात आले. त्या कारमध्ये गुटखा भरण्यात आला. तसेच अन्न व औषधचे नमुना सहायक सुनील सर्वगोड, चालक व अनोळखी एकजण त्या कारमध्ये बसला. संबंधित कार साताऱ्याकडे मार्गस्थ झाली. तर त्यापाठोपाठ अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे व राहुल खंडागळे आरोपी बिष्णोई याला घेऊन कारने साताऱ्याकडे निघाले.दरम्यान, संबंधित कार व कार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवडे गावच्या हद्दीत गणेश हॉटेलनजीक पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी जेवण करण्यासाठी वाहने थांबविली. त्याठिकाणी आरोपीसह सर्वांनी जेवण केले. त्यानंतर सर्वजण गाडीत बसण्यासाठी निघाले. कारचा चालक व त्याच्यासोबतचा अनोळखी व्यक्ती कारमध्ये बसला. बिष्णोईही धावत जाऊन कारमध्ये चढला. त्याने अन्न औषधचे नमुना सहायक सर्वगोड यांना खाली ढकलून दिले. तसेच त्यांच्या अंगावर कार घालण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी बिष्णोई याच्यासह संबंधित कारचा चालक व अनोळखी एकजण २ लाच ७० हजारांचा गुटखा घेऊन पुण्याच्या दिशेने पळाले. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र काकडे यांनी उंब्रज पोलिसांत फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजीराव जगताप तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)गुटख्याची पुण्यात विक्रीआरोपी ओमप्रकाश बिष्णोई हा कर्नाटकच्या निपाणी भागातून गुटख्याची खरेदी करीत होता, अशी माहिती शहर पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी तो जीप घेऊन कर्नाटकला गेला होता. तेथे त्याने पावणे तीन लाखांचा गुटखा खरेदी केला. हा गुटखा तो पुण्यात विकणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. चालकाचा फोटो पोलिसांना मिळालाआरोपी बिष्णोई याला कारमधून पळवून घेऊन जाणाऱ्या चालकाचा फोटो पोलिसांना मिळाला आहे. संबंधित चालक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच तो राजस्थानचा आहे. मात्र, त्याचे नाव व इतर माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांना मिळाली नव्हती. पोलिसांनी फोटोवरून त्या चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.गुटख्याची पुण्यात विक्रीआरोपी ओमप्रकाश बिष्णोई हा कर्नाटकच्या निपाणी भागातून गुटख्याची खरेदी करीत होता, अशी माहिती शहर पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी तो जीप घेऊन कर्नाटकला गेला होता. तेथे त्याने पावणे तीन लाखांचा गुटखा खरेदी केला. हा गुटखा तो पुण्यात विकणार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. चालकाचा फोटो पोलिसांना मिळालाआरोपी बिष्णोई याला जीपमधून पळवून घेऊन जाणाऱ्या चालकाचा फोटो पोलिसांना मिळाला आहे. संबंधित चालक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच तो राजस्थानचा आहे. मात्र, त्याचे नाव व इतर माहिती रात्री उशिरापर्यंत पोलिसांना मिळाली नव्हती. पोलिसांनी फोटोवरून त्या चालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.