थेरगावात घर जाळण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: September 30, 2016 04:47 IST2016-09-30T04:47:47+5:302016-09-30T04:47:47+5:30
पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून तिघा जणांनी संगनमताने एकाच्या दुचाकी आणि घरावर रॉकेल ओतून पेटविण्याची घटना घडली़ ही घटना बुधवारी रात्री पावणेएकच्या

थेरगावात घर जाळण्याचा प्रयत्न
पिंपरी : पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून तिघा जणांनी संगनमताने एकाच्या दुचाकी आणि घरावर रॉकेल ओतून पेटविण्याची घटना घडली़ ही घटना बुधवारी रात्री पावणेएकच्या सुमारास साईनाथनगर पडवळनगर थेरगाव येथील मोकळ्या जागेत घडली़ या प्रकरणी आरोपी अक्षय उर्फ आकाश अनिल जाधव, राहूल क्षीरसागर (दोघेही रा़ पडवळनगर थेरगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे़ तर इमरान शेख (राग़ुजरनगर थेरगाव) हा फ रार आहे़ या बाबत राजू परदेशी (वय २८ रा़ थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे़
फिर्यादी राजू यांनी काही दिवसांपूर्वी भांडणे झाल्यामुळे आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती़ त्याचा राग मनात धरून आरोपी अक्षय उर्फ आकाश, राहूल, इमरान यांनी राजूच्या घरासमोर पार्क केलेली दुचाकीवर रॉकेल ओतून पेटवून दिली़ तसेच राहत्या घराच्या दरवाजावर रॉकेल ओतून पेटविले़ आगीमध्ये दुचाकी आणि अर्धवट दरवाजा
जळून पाच हजारांचे नुकसान
झाले आहे़ अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही़व्ही़ पाटील करीत आहेत़(प्रतिनिधी)