पिंपळवंडीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: October 25, 2014 22:26 IST2014-10-25T22:26:17+5:302014-10-25T22:26:17+5:30
पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथे गुरुवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले.

पिंपळवंडीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न
पिंपळवंडी : पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथे गुरुवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास चोरटय़ांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडले. मात्र, मशिनमध्ये पैसेच शिल्लक नसल्यामुळे चोरटय़ांचा प्रयत्न फसला. या घटनेमुळे बँकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एन. के. मोहरे यांनी दिलेली माहिती अशी की, येथील डी. आर. काकडे पॉलिटेक्निक कॉलेजच्या शेजारी बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. या शाखेच्या बाजूला असलेल्या एटीएमच्या केबिनमध्ये घुसून चोरटय़ांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास एटीएम फोडून त्यामधील पैसे काढण्याचा प्रय} केला. परंतु, एटीएममध्ये पैसे शिल्लक नसल्याने चोरीचा प्रय} फसला. चोरटय़ांनी चोरी करण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅम:याचीही तोडफोड केली आहे.
या ठिकाणी पिंपळवंडी (शिवनगर) येथील एका तरुणाची मोटारसायकल आढळली असून, पोलिसांनी याबाबत संबंधित तरुणाकडे चौकशी केली असता, मोटारसायकल चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी बँकेच्या बाहेर आणि आत असलेल्या सीसीटीव्ही कॅमे:याचे फुटेज मागविले असून, चोरटय़ांना लवकरच अटक करण्यात येईल, असे मोहरे यांनी सांगितले.
एटीएममधील पैशांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची गरज असतानाही नेमणूक का झाली नाही, असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित केला
जात आहे. (वार्ताहर)
4पिंपळवंडी परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भुरटय़ा चो:यांचे सत्न सुरू असून, परिसरात अनेक शेतक:यांच्या कुकडी नदीच्या काठावर बसवलेल्या मोटारी आणि केबलच्या चो:या झाल्या आहेत. या चो:यांच्या तपासात पोलिसांना अपयश येत असल्याने मोटार आणि केबल चोरीच्या तक्रारी देण्यास कुणी पुढे येत नसल्याचे येथील शेतक:यांनी सांगितले. या परिसरात नेहमीच छोटय़ा-मोठय़ा चो:या होतात.
4या चो:या किरकोळ स्वरूपाच्या असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार नसल्यामुळे नोंद होत नाही. त्यामुळे या भुरटय़ा चो:यांचे सत्न अद्यापही सुरूच आहे. पोलीस आणि पिंपळवंडी ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी पोलीस दूरक्षेत्नाची सुसज्ज इमारत बांधण्यात आली. परंतु, या ठिकाणी तीन पोलीस कर्मचारी नेमणुकीस असूनही हे पोलीस दूरक्षेत्न कायमच बंद असते.