शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
3
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
4
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
5
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
6
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
7
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
8
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
9
नववधूने 'ती' मागणी पूर्ण केली नाही; संतापलेल्या पतीने केलं असं काही की ऐकून येईल राग!
10
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
11
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
12
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
13
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
14
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
15
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
16
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
17
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
18
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
19
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
20
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश

पर्यावरणासाठी 'ही' कृती करून पाहा! अभिनेत्री गौतमी देशपांडेचे नागरिकांना आवाहन

By श्रीकिशन काळे | Updated: July 4, 2023 15:37 IST

रोज आपणच दिवसभरात किती कचरा जमा करतो, त्याचा एक्सरसाइज करावा, असे आवाहनही तिने केले आहे...

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही काही चाललं आहे. पण महाराष्ट्रातील राजकारण काय चालले यापेक्षा जास्त एक विषय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याकडे आपले अजिबात लक्ष नाहीय. इतर गोष्टींकडेच अधिक लक्ष देत आहोत. या गोष्टींनी आपण मरणार नाही. आपल्याला आयुष्याला जो धोका आहे, तो विषय म्हणजे हवामान बदल हा आहे. प्लास्टिक ही समस्या आपल्यासाठी घातक आहे. मी स्वत: बदल घडवून लोकांना सांगते आहे, अशा भावना अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने व्यक्त केल्या आहेत. रोज आपणच दिवसभरात किती कचरा जमा करतो, त्याचा एक्सरसाइज करावा, असे आवाहनही तिने केले आहे. 

नुकताच मी एक माहितीपट पाहिला. त्यात एक आयलंड आहे. तिथे माणूस पोचलेला नाही, पण तिथे प्लास्टिक पोचले आहे. ही किती भयानक गोष्ट आहे. हे आपणच घडवून आणत  आहोत. त्यामुळे पक्षी, प्राणी, निसर्गाला याचा धोका आहे. प्राणी, पक्ष्यांच्या अन्नात प्लास्टिक मिसळत आहे. त्यामुळे त्यांचे आयुष्य संपत आहे. मी खरेदी करताना अनेक दुकानात गेले. तेव्हा तिथे पाणी दिले जाते. ते सरळ प्लास्टिकची बाटली देतात. त्याऐवजी पिंप ठेवला, स्टीलचे ग्लास ठेवले तर उत्तम होईल. त्यातून उत्तम नागरिक म्हणून तुम्ही योग्य ठराल. आपण जर घराबाहेर जात असू, तर स्टीलची बाटली सोबत ठेवावी. ती संपली तर कुठेही भरून घेता येईल. त्यामुळे प्लास्टिक बाटली विकत न घेता असा पर्याय निवडावा. सहज उपलब्ध होते, म्हणून प्लास्टिक बाटली घेऊ नका. आता आपल्याला याचा धोका समजत नाहीय. पर्यावरणाचा ऱ्हास यातून होत आहे. म्हणून थोडं लक्ष देऊन प्लास्टिक वापरणे बंद करायला हवे. किमान कमी कसे करता येईल, ते पाहूया.

नदी पात्रात देखील खूप प्लास्टिकचा कचरा टाकला जातो. त्याने नदीला पुराचा धोका निर्माण होतो. हा कचरा कोण टाकतो ? तर नागरिकच टाकतात. आपल्यातीलच काही माणसं हे करत आहेत. त्यांनी जरा यावर आळा घालायला हवा. मी माझ्या घरात खूप कचरा तयारच करणार नाही, असा प्रण करूया.

एक टास्क प्रत्येकाने करावा. सकाळी उठल्यावर एक बादली घ्या आणि त्यात दिवसभरात किती प्लास्टिक जमा होते, ते त्यात टाका. मग पहा किती दिवसभरात प्लास्टिक जमा करत आहोत. त्यावरू अंदाज करा की, असा कचरा प्रत्येक घरात किती तयार होत असेल आणि त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. हा एक्सरसाइज तुम्ही नक्की करा, असे माझे आवाहन आहे.

- गौतमी देशपांडे, अभिनेत्री

टॅग्स :environmentपर्यावरणPuneपुणेGautami Deshpandeगौतमी देशपांडेPlastic banप्लॅस्टिक बंदी