परीक्षा शुल्क कमी करण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: November 16, 2016 03:26 IST2016-11-16T03:26:44+5:302016-11-16T03:26:44+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांवर अधिकचे शुल्क भरण्याची वेळ येऊ नये,

परीक्षा शुल्क कमी करण्याचा प्रयत्न
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांवर अधिकचे शुल्क भरण्याची वेळ येऊ नये, या उद्देशाने राज्य मंडळाने अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी वाढत जाणारी दंडाची रक्कम भरावी लागणार नाही.
नोटा बंदच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शासनाने सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही कारणास्तव दहावीचा परीक्षा अर्ज भरू शकणार नाहीत त्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची संधी दिली जाईल. अतिविलंब शुल्काची रक्कम जास्त होऊ आणि एकही विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये, याबाबतची काळजी घेतली जात आहे, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.