हेच नाट्यसृष्टीचे खरे आधारस्तंभ

By Admin | Updated: January 24, 2017 02:33 IST2017-01-24T02:33:25+5:302017-01-24T02:33:25+5:30

पडद्यामागचे कलाकार हेच नाट्यसृष्टीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अविरत मेहनतीमुळेच नाटक रंगमंचावर जिवंत होते.

This is the true pillar of theater | हेच नाट्यसृष्टीचे खरे आधारस्तंभ

हेच नाट्यसृष्टीचे खरे आधारस्तंभ

पुणे : पडद्यामागचे कलाकार हेच नाट्यसृष्टीचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अविरत मेहनतीमुळेच नाटक रंगमंचावर जिवंत होते. त्यांच्यामुळे नाट्यसृष्टी जिवंत राहते, असे मत ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीनिवास भणगे यांनी व्यक्त केले.
अहमदनगर शहरवासीय मित्रमंडळाचा वर्धापन दिन पुण्यातील गोपाळ हायस्कूलमध्ये पार पडला. मंडळाने वर्धापन दिनानिमित्त नाट्यसृष्टीमध्ये पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ कलाकार श्रीराम रानडे, अविनाश देशमुख उपस्थित होते.
कलाकारांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, की पडद्यामागच्या प्रत्येक कलाकाराची नाट्यसृष्टीवर निष्ठा असते. कलाकाराप्रमाणे आम्हालाही काम करण्यापूर्वी संपूर्ण नाटक समजून घ्यावे लागते. त्याशिवाय, आम्ही यशस्वीरीत्या काम करू शकत नाही. अशा प्रकारच्या पुरस्कारांनी अधिकाधिक काम करण्याची उमेद मिळते. आमच्या जिवात जीव असेपर्यंत आम्ही नाट्यसृष्टीची सेवा करीत राहू.’
या कार्यक्रमास प्र. ल. गावडे, श्रीराम चौधरी, सुधीर दार्वेकर, बापू पोतदार, डॉ. अ. ल. देशमुख व नगर मंडळाचे २४० सदस्य उपस्थित होते. नगरची विद्यार्थिनी अपूर्वा गिलचा पायलट म्हणून निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
(प्रतिनिधी)

Web Title: This is the true pillar of theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.