रस्त्याच्या ड्रेनेजमध्ये रुतले ट्रकचे चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST2021-05-31T04:08:45+5:302021-05-31T04:08:45+5:30

बारामती शहरातील भिगवण चौकानजीक बालक मंदिर शाळेसमोर आज सकाळी दहाच्या सुमारास येथील एका गोडाऊनमध्ये युरिया उतरविण्यासाठी ट्रक आला होता. ...

Truck wheels stuck in road drainage | रस्त्याच्या ड्रेनेजमध्ये रुतले ट्रकचे चाक

रस्त्याच्या ड्रेनेजमध्ये रुतले ट्रकचे चाक

बारामती शहरातील भिगवण चौकानजीक बालक मंदिर शाळेसमोर आज सकाळी दहाच्या सुमारास येथील एका गोडाऊनमध्ये युरिया उतरविण्यासाठी ट्रक आला होता. मात्र, रस्त्यात मोडकळीस आलेल्या ड्रेनेजमध्ये अवजड ट्रकचे चाक रुतले व चेंबर खचला. ड्रेनेजमध्ये चाक रुतल्याने ट्रक एका बाजूला कलंडला अगदी काही फुटांवरच याठिकाणी घरे आहेत. शिवाय, या रस्त्यावरून मोठी रहदारी होत असते. ट्रकचे चाक रुतून जागेवरच कलंडल्याने सुदैवाने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, येथील रहिवासी गिरीश दळवी यांनी बारामती नगरपालिकेकडे नुकतीच येथील चेंबर खचून मोठा खड्डा पडल्याने तो दुरुस्त करण्यासाठी अर्ज केला होता. पालिकेकडून तीन दिवसांपूर्वीच सदर ड्रेनेजची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.

बारामती शहरात रस्त्यावरील ड्रेनेजमध्ये चाक गेल्याने ट्रकची झालेली अवस्था.

३००५२०२१-बारामती-०५

Web Title: Truck wheels stuck in road drainage