ट्रक पेटल्याने वाहतूककोंडी

By Admin | Updated: December 17, 2014 05:31 IST2014-12-17T05:31:59+5:302014-12-17T05:31:59+5:30

मुुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अचानकपणे ट्रकने पेट घेतल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास बंद होती. आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक

The truck was packed with truck drivers | ट्रक पेटल्याने वाहतूककोंडी

ट्रक पेटल्याने वाहतूककोंडी

उर्से : मुुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अचानकपणे ट्रकने पेट घेतल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास बंद होती. आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. ही घटना सव्वापाच वाजता किलोमीटर क्र. ८० जवळ घडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई-भिवंडी येथून ट्रान्सपोर्टद्वारे माल घेवून निघालेला ट्रक क्रमांक (एचएच ०४, सीजी ५९८९) हा ओझर्डे गावाच्या पुढे किलोमीटर क्रमांक ८० जवळ आला असता वाहनचालक श्रीपती संभाजी धुमाळे याला आरश्यामधून मागील बाजूस धूर येत असल्याचे समजले. यानंतर तात्काळ गाडी बाजुला घेवून पाहिले असता गाडीने तत्पर पेट घेतला.
या वेळी येथून पळाल्याने वाहनचालकाचा जीव वाचला. मात्र गाडीने पेट घेतल्याने गाडीतील एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये एक जण गंभीररित्या जखमी झाला. गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. या वेळी आग विझविण्यासाठी आयआरबी तळेगाव पिंपरी-चिंचवड येथील तीन अग्निशामक दलाचे बंद यांनी आग विझवली.
मुंबई-पुणे बाजुवरील वाहनचालकांची रांग सुमारे २० किलोमीटर लांब लागली होती. रांग लागली होती. (वार्ताहर)

Web Title: The truck was packed with truck drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.