ट्रक दुचाकीच्या अपघात एक ठार

By Admin | Updated: May 5, 2017 23:56 IST2017-05-05T23:56:54+5:302017-05-05T23:56:54+5:30

भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पाटस- बारामती

The truck killed one in a motorcycle accident | ट्रक दुचाकीच्या अपघात एक ठार

ट्रक दुचाकीच्या अपघात एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
सुपे : भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पाटस- बारामती रस्त्यावरील खराडेवाडी हद्दीतील गुंजखिळा येथे सकाळी आठच्या दरम्यान घडली.
राम धोंडोपंत पुरंधरे (वय २४ रा. शिंपोरे, ता. कर्जत, सद्या रा. बारामती) जागीच ठार झाला. या अपघातातील ट्रक चालक पळुन गेला आहे. पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार विशाल कैलास काळे (रा. शिंपोरे, ता. कर्जत, सद्या रा. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राम पुरंधरे आणि काळे वेगवेगळ्या दुचाकीवर पाटस येथील काम आटोपुन बारामतीकडे येत असताना खराडेवाडी हद्दीतील गुंजखिळा येथे बारामती बाजुकडुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने समोरील पुरंधरे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये पुरंधरे यांच्या डोक्याला व उजव्या डोळ्याच्यावर जबरदस्त मार लागला. त्यामुळे त्यांच्या नाकातोंडातुन रक्तस्त्राव सुरु होता. यावेळी काळे यांना पुरंधरे हा जागीच ठार झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर काळे यांनी पोलिसात फिर्याद दिली. यासंदर्भात सुपे येथील फौजदार के. बी. मोरे यांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The truck killed one in a motorcycle accident