शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या बसला ट्रकची धडक ; चालक - वाहकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 21:11 IST

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुस फाट्याजवळ बसचा टायर पंक्चर काढत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने  बसला धडक दिल्याने भोर एस.टी आगारातील चालकांचा जागीच तर वाहकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पुणे (भोर) : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुस फाट्याजवळ बसचा टायर पंक्चर काढत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने  बसला धडक दिल्याने भोर एस.टी आगारातील चालकांचा जागीच तर वाहकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  ही घटना मंडळवारी (दि १५) पहाटे ४.३० वाजता घडली.   मोहन उत्तम बांदल (वय ५५ रा महुडेबुदुक ता.भोर) या चालकाचा जागीच तर वाहक शंकर चंद्रकांत चव्हाण (वय ३५ रा भोळी ता.खंडाळा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहन बांदल यांचा मुलगा एस.टी डेपोत कामाला असुन शंकर चहाण याचे वडील वारले असुन ते घरात एककुलते एक असल्याने त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार  भोर एस.टी आगाराची (एम.एच १४ बी.टी) बस मुंबई सेंट्रलवरुन रात्री निघाली. मुंबई पुणे महामार्गावरील सुस गावाजवळ बस आल्यावर बसचा पुढचा टायर पंक्चर झाला. चालक मोहन बांदल यांनी बस थांबुन झोपेत असलेल्या प्रवाशांना उठवुन बाहेर येण्यास सांगिलते. बसचा टायर बदलत असताना एका भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात टायर बदललत असलेले चालक मोहन उत्तम बांदल यांचा जागीच मृत्यू झाला तर वाहक शंकर चंद्रकांत चव्हाण हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा  दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  ७५ प्रवाशांचे प्राण वाचवणा-या चालक वाहकावर काळाचा घाला.  भोर-महाड एस.टी आगाराच्या बसचे वरंध घाटात ब्रेक फेल झाले होते. यावेळी प्रसंगावधान राखुन चालक मोहन बांदल यांनी गाडी बाजुला घेत गाडी दरीत पडता पडता थांबवुन एस.टी मधील ७५ प्रवाशांचे प्राण वाचवले होते. आज अखेर अशा गुण चालकावर काळाले घाला घातला यामुळे चालक आणि वाहक यांच्या गावात शोककळा पसरली होती.

टॅग्स :AccidentअपघातBus DriverबसचालकDeathमृत्यू