चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:10 IST2021-02-12T04:10:33+5:302021-02-12T04:10:33+5:30

--- पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी पौड : पूर्ववैमनस्यातून दोन गटांतून हाणामारी झाली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

The truck driver was robbed at gunpoint | चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटले

चाकूचा धाक दाखवून ट्रकचालकास लुटले

---

पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी

पौड : पूर्ववैमनस्यातून दोन गटांतून हाणामारी झाली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पौड गावातील विठ्ठलवाडी फाया येथील ओंबाळेवस्तीमध्ये घडली. याप्रकरणी श्रीवर्धन ऊर्फ दाद्या रमेश तिकोणे, आकाश राम दाभाडे, मारूत बाबू आखाडे, शंकर बाबू आखाडे, ऋषी ढेपे, शिऱ्या उर्फ वैभव वाघचौच आमि त्याचे आणखी पाच ते सहा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सौरभ राजेंद्र बानगुडे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

---

पेट्रोल पंपावर एकास मारहाण

--

लोणी काळभोर : पेट्रोल पंपावरील कामगारांना फूस लावतोस असे म्हणत एकाने तरुणाला मारहाण केली. ही घटना उरुळी देवाची येथील एसपी पेट्रोलपंपासमोर मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी संजय अशोक धुरे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप रामनाथ दंगडुले हा पेट्रोलपंपावर त्याच्या मित्राशी बोलत उभा राहिला असताना संजय याने त्याच्यावर हल्ला केला. त्यानंतर संदीप दंडगुले याने फिर्याद दिली असून त्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

---

जमीन मोजणीच्या कारणावरून मारहाण तिघांना मारहाण

लोणीकाळभोर : जमीन मोजणी करण्यासाठी मोजणी अधिकाऱ््यांना घेऊन आलेल्या व्यक्तीसह त्याच्या दोन नातेवाईकांना मारहाण केली. ही घटना बुधवारी सकाळी बाराच्या सुमरासा लोणीकाळभोर परिसरातील कोडेवस्ती येथे घडली. याप्रकरणी विजय अम्रृत गोते व दशरथ अमृत गोते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत भानुदास बबन शेंडगे यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार लोणीकाळबोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: The truck driver was robbed at gunpoint