ट्रकच्या धडकेत कारचालक ठार

By Admin | Updated: May 1, 2017 02:24 IST2017-05-01T02:24:15+5:302017-05-01T02:24:15+5:30

बोरीभडक गावाच्या हद्दीत नादुरुस्त झालेल्या सँट्रो कार रस्त्याच्या कडेला उभी करून पाहणी करत असताना पाठीमागून

A truck driver was killed in a truck crash | ट्रकच्या धडकेत कारचालक ठार

ट्रकच्या धडकेत कारचालक ठार

यवत : बोरीभडक गावाच्या हद्दीत नादुरुस्त झालेल्या सँट्रो कार रस्त्याच्या कडेला उभी करून पाहणी करत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत कारचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात काल (दि. २९) रात्री साडेनऊच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर घडला.
रशीद फकरूद्दीन शेख (वय ५२ वर्षे, रा. खडकी) असे मृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव आहे. मयत शेख हे पत्नी व दोन मुलांसह कार (एम. एच. १४ पी. बी. २८८५) मधून उस्मानाबाद ते पुणे महामार्गावरून प्रवास करीत होते. कार बोरीभडक गावाच्या हद्दीत आली असता मोटारीचे आॅईल सांडत असल्याचे शेख यांच्या लक्षात आले. मोटार रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूला उभी करून मोटारीचा दरवाजा उघडून खाली उतरत असताना पाठीमागून सोलापूर बाजूकडून भरधाव वेगात आलेल्या मालवाहू ट्रकने चालक शेख यांना जोराची धडक दिली.

Web Title: A truck driver was killed in a truck crash