कांदा उत्पादकांचे तिहेरी नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST2021-04-03T04:09:53+5:302021-04-03T04:09:53+5:30
बाहेरील शेतकऱ्यांकडून विकत घेऊन शेतात कांदा रोपे तयार केले. कांदा रोपे तयार केल्यामुळे शेतातच शेतकरीवर्गाने कांदा लागवड सुरू केली. ...

कांदा उत्पादकांचे तिहेरी नुकसान
बाहेरील शेतकऱ्यांकडून विकत घेऊन शेतात कांदा रोपे तयार केले. कांदा रोपे तयार केल्यामुळे शेतातच शेतकरीवर्गाने कांदा लागवड सुरू केली. कांदा रोपे चांगली आली व कांदा शेतकऱ्यांनी शेतात लागवड केला असल्यामुळे शेतकरी वर्गाला एकीकडे पावसाळ्यात रोपे वाया गेले, तर दुसरीकडे बोगस बियाणे निघाल्यामुळे आर्थिक फटका बसलेला आहे.
कांद्याचे पडलेले बाजारभाव, कांदा बियांचे वाढलेले बाजारभाव आणि बियांमध्ये झालेली फसवणूक असा तिहेरी फटका शेतकऱ्यांना बसला. कांद्याचे एकरी अडीचशे-तीनशे बॅग उत्पन्न निघत होते परंतु हेच उत्पन्न ५० ते ६० बॅग निघत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. घरगुती पद्धतीने तयार केलेले बियाणे हेच उत्कृष्ट असते परंतु अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गाला बाहेरील बी विकत घ्यावे लागले. त्यामुळे यंदा कांदा पुन्हा एकदा शेतकऱ्यांना रडवत असल्याची भावना कांदा उत्पादक शेतकरी लोखंडे यांनी केले.