तिहेरी अपघात; २ ठार, २ जखमी
By Admin | Updated: December 13, 2015 23:56 IST2015-12-13T23:56:51+5:302015-12-13T23:56:51+5:30
राष्ट्रीय महामार्ग २२२ (नगर-कल्याण) वर शनिवारी (दि. १२) तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने तिहेरी अपघात झाला. या अपघातात २ जण जागीच मरण पावले.

तिहेरी अपघात; २ ठार, २ जखमी
ओतूर : राष्ट्रीय महामार्ग २२२ (नगर-कल्याण) वर शनिवारी (दि. १२) तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने तिहेरी अपघात झाला. या अपघातात २ जण जागीच मरण पावले. दोन जण जखमी झाले. त्यातील एक गंभीर आहे. हा अपघात पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) गावाच्या हद्दीत झाला.
सिद्दीकी सरोजिन देवानी (वय ५३, ), नंदलाल सुंदरलाल (वय ५२) हे दोही अहमदनगरचे जागीच ठार झाले. श्रीचंद गुलाबभाई गंभीर जखमी असून, टेम्पोचालक विशाल अकेर्डे (वय २४, रा. डिंगोरे) किरकोळ जखमी आहे. त्यांना आळेफाटा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
आळेफाटाकडून ओतूरकडे बटाटा भरून टेम्पो (एमएचडीएम ४७०५) भरधाव वेगाने जात असताना चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला. त्याचबरोबर ओतूरकडून आळेफाट्याकडे जाणारी मोटार (एमएच ०५ बीएल १२२६) चुकीच्या बाजूने जाऊन समोरासमोर धडक झाली. टेम्पोपाठोपाठ आळेफाट्याकडून ओतूरकडे जाणारी मोटार (एमएच १६ बीसी १२२३) त्या टेम्पोला पाठीमागून धडकली. त्यामुळे टेम्पो रस्त्यावरच उलटला.
मोटार (एमएच १६ बीसी १३२३) येथील वाहनचालक गंभीर जखमी झालेला आहे.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जावून मोटारीमधील दोन मृतदेह नागरिकांच्या साहाय्याने बाहेर काढले. ओतूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताची नोंद केली आहे.
(वार्ताहर)