कष्टकरी महिलांच्या सन्मानाने राजमाता जिजाऊंना मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:37 IST2020-11-22T09:37:04+5:302020-11-22T09:37:04+5:30

जिजाऊं समाधी समाधी स्थळावर मावळा जवान संघटनेच्या वतीने रायगड परिसरातील कष्टकरी महिलांना साडी, चोळीची भाऊबीज भेट देऊन राजमाता जिजाऊ ...

Tribute to Rajmata Jijau in honor of the hardworking women | कष्टकरी महिलांच्या सन्मानाने राजमाता जिजाऊंना मानवंदना

कष्टकरी महिलांच्या सन्मानाने राजमाता जिजाऊंना मानवंदना

जिजाऊं समाधी समाधी स्थळावर मावळा जवान संघटनेच्या वतीने रायगड परिसरातील कष्टकरी महिलांना साडी, चोळीची भाऊबीज भेट देऊन राजमाता जिजाऊ यांना मानवंदना दिली.

जय जिजाऊ, जय शिवराय च्या जयघोषात पांरपारीक रिवाजात राजमाता जिजाऊंच्या समाधीचे पुजन केले.

समाधी स्थळावर आकर्षक रांगोळी, फुलांची सजावट केली होती.

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज शितल मालुसरे, इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे, प्रा. नामदेव जाधव, शुरवीर गोविंद गोपाळ यांचे वंशज राजेंद्र गायकवाड, विजय तनपुरे,संदिप वाडेकर, राजेंद्र सोनवणे, पाचाडच्या सरपंच संयोगिता गायकवाड, आण्णासाहेब चव्हाण, निखिल तनपुरे, सुनिल ढेबे, कृपाल महाडिक, प्रदिप सरखले आदींसह रायगड, पुणे कोल्हापूर परिसरातील शिवभक्त सहभागी झाले होते.

Web Title: Tribute to Rajmata Jijau in honor of the hardworking women