निरेत हुतात्म्यांना श्रध्दांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:08 IST2020-11-28T04:08:41+5:302020-11-28T04:08:41+5:30
२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या योद्यांना नीरा येथील पोलीस चौकीमध्ये पोलिसांनी अभिवादन केले. नीरा ...

निरेत हुतात्म्यांना श्रध्दांजली
२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या योद्यांना नीरा येथील पोलीस चौकीमध्ये पोलिसांनी अभिवादन केले. नीरा पोलीस चौकीमध्ये या शहिदांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. २६/११/२००८ रोजी सागरी मार्गे झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत आहे. या दिवशी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात त्यांच्याशी दोन हात करताना हौतात्म्य आलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि समान्य नागरिकांच्या बलिदान बद्दल देशातील लोक नेहमीच ऋणी रहातील असे म्हणत नीरा औट पोस्ट मध्ये पोलीस हवालदार राजेंद्र भपाकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या शहीदांना अभिवादन केले. या यावेळी पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, प्राथमीक शिक्षक प्रवीण जोशी, पोलीस शिपाई निलेश जाधव, होमगार्ड स्वप्नील भेस्के, मोहन साळुंखे आदी उपस्थित होते.या सर्वांनी शहिदांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.