शहिदांना श्रद्धांजली

By Admin | Updated: November 16, 2016 03:17 IST2016-11-16T03:17:34+5:302016-11-16T03:17:34+5:30

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आंबेगाव दत्तनगर येथील श्री सिद्धी विनायक सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक दिवा शहिदांसाठी’ या

Tribute to martyrs | शहिदांना श्रद्धांजली

शहिदांना श्रद्धांजली

धनकवडी : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आंबेगाव दत्तनगर येथील श्री सिद्धी विनायक सामाजिक शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक दिवा शहिदांसाठी’ या उपक्रमांतर्गत दिव्यांची आरास करुन हा उत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी सैनिकांना श्रद्धांजली वाहात असलेली एक विशालकाय रांगोळी व लक्ष लक्ष दिव्यांनी या सिद्धिविनायक मंदिराला उजळून टाकण्यात आले होते. या वेळचा प्रसंग उपस्थित नागरिकांचे मन हेलावून गेला. कार्यक्रमाला ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शंकर बेलदरे, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक तसेच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आंबेगाव बुद्रुक येथील शिवगोक्ष आश्रमामध्येदेखील त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त येथील दीपमाळ तसेच मंदिर आवारामध्ये दिवे लावण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Tribute to martyrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.