भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईकांना मानवंदना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:48+5:302021-02-05T05:03:48+5:30
राज्याचे युवक अध्यक्ष सुनील चव्हाण, उमाजी यांचे सातवे वंशज रमणअण्णा खोमणे व चंद्रकांत खोमणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात ...

भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईकांना मानवंदना
राज्याचे युवक अध्यक्ष सुनील चव्हाण, उमाजी यांचे सातवे वंशज रमणअण्णा खोमणे व चंद्रकांत खोमणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते गंगाराम जाधव,गणपत शितकल, पुरंदर तालुका अध्यक्ष साहेबराव जाधव, अमृत भांडवलकर, सरपंच श्वेता चव्हाण, सदस्य अश्विनी चव्हाण, बापूसाहेब मोकाशी, संजय दिघे, राहुल मोकाशी, पुष्पा वांढेकर, अंजना पवार, मोहन जैनक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
यावेळी राज्याच्या महिला अध्यक्षा सुजाता जाधव, उपाध्यक्ष अंकुश जाधव, कार्याध्यक्ष संजय जाधव, सीताराम चव्हाण, अप्पा भांडवलकर, अग्निनाथ चव्हाण, देविदास खोमणे, बाळासाहेब मदने , संतोष जाधव, एम. आर. चव्हाण, बापूसाहेब शिरतोडे, संतोष जाधव, दशरथ मदने, अविनाश जाधव, गणेश खोमणे, राहुल मदने, नंदू बोराडे, शामराव मदने, अविनाश भोसले, बापूसाहेब शिंदे, शिवाजी चव्हाण, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.
सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने भिवडीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राज्याचे प्रवक्ते गंगाराम जाधव यांनी माहिती दिली की, भारतात इंग्रजी सत्तेला पहिला हादरा राजे उमाजी नाईक यांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेवून साथीधारांच्या सहकार्याने स्वातंत्र लढा उभारून इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
भिवडी (ता. पुरंदर) येथील शासकीय स्मारकातील क्रांतीस्तंभासमोर आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईकांना मानवंदना देत असताना मान्यवर पदाधिकारी.