आदिवासी बांधवांचाही मतदानावर बहिष्काराचा इशारा

By Admin | Updated: February 2, 2017 03:43 IST2017-02-02T03:43:23+5:302017-02-02T03:43:23+5:30

कान्हेवाडी बुद्रुक चासकमान परिसरातील कान्हेवाडीच्या डोंगरावरील ठाकरवाडीतील आदिवासी बांधवाना गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत.

Tribal brothers warn of boycott of voting | आदिवासी बांधवांचाही मतदानावर बहिष्काराचा इशारा

आदिवासी बांधवांचाही मतदानावर बहिष्काराचा इशारा

चासकमान : कान्हेवाडी बुद्रुक चासकमान परिसरातील कान्हेवाडीच्या डोंगरावरील ठाकरवाडीतील आदिवासी बांधवाना गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात निवेदन देऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.
कान्हेवाडी बु. गावची आणि आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या उंच डोंगरावर ठाकरवाडी आहे. या ठिकाणी १०० घरे आहेत. कान्हेवाडी ते ठाकरवाडी अंतर पाच किमी आहे. या ठाकरवाडीला अद्यापही चांगला रस्ता नाही. येथे चौथीपर्यंतच शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाच किमीची पायपीट करावी लागते. ठाकरवाडीला अद्यापही पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. विजेची पुरेशी सोय नसल्याने कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे ही वाडी नेहमीच अंधारात असते.
निवडणूका जवळ आल्या, की मतदानापुरते येणारे पुढारी फक्त आश्वासने देऊन जातात. नंतर कुणीही त्यांच्याकडे फिरकत नाही.
मतदानावर बहिष्कार टाकण्याचे निवेदन भोरू केदारी, राजेंद्र कडाळे, रामभाऊ मधे व मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी दिले.

Web Title: Tribal brothers warn of boycott of voting