शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आदिवासी भाग दुष्काळी छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 1:56 AM

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे, या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

तळेघर : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे, या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, पाटण व आहुपे ही खोरी मुसळधार पडणाºया पावसाची माहेरघर समजली जातात; परंतु या भागामध्ये खापर पंजोबा उपार्जित काळापासून आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मैलोंमैल पायपीट करावी लागत आहे. पावसाळ्यामध्ये चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही.अनेक वर्षांपासून या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या भागातील विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी आदी उपलब्ध असणारे जलस्रोत पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतात; परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहत नाही.आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा, यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, कूपनलिका, पाझर तलाव यासारखे जलस्रोत काढण्यात आले आहेत; परंतु या भागात पडणाºया दुष्काळासमोर या जलस्रोतांनी गुडघे टेकले आहेत. या भागातील असणाºया जलस्रोतांमधील पाणी खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. या पाण्याची दुर्गंधी येत असून पर्यायी हेच पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे.परिणामी, सध्या या भागामध्ये आदिवासी जनतेला साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे.अवघ्या हाकेच्या अंतरावरती डिंभे धरण उशाला असून वर्षानुवर्ष या भागातील जनतेच्या घशाला कोरड पडली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील तळेघर, कोंढरे, कुशिरे, माळीण, आमडे, कोंढवळ, राजापूर, फलोदे, फुलवडे या गावांच्या मोहरेवाडी, नंदकरवाडी, गोहे खुर्द, गाडेकरवाडी, डामसेवाडी, जांभोरीची माचीचीवाडी, काळवाडी नं. १, काळवाडी नं. २, नानवडे, आहुपे, बालवीरवाडी, वनदेव, बोरघरची जायवाडी, घोडेवाडी, आवळेवाडी, माळवाडी, घोटमाळ, असाणे, जांभळवाडी, मेनुंबरवाडी, कुंभेवाडी, गवारवाडी, सावरली, गोहे बुद्रुक, बोरीचीवाडी, पाटीलबुवाचीवाडी, सायरखळा, उभेवाडी, वाल्मीकवाडी, पाचवड, पोटकुलवाडी या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. या भागामध्ये जसा जसा उन्हाळा जाणवत आहे, तसतशा दुष्काळाच्या झळा आदिवासी जनतेला सोसाव्या लागत आहेत.>ग्रामपंचायतींनी टँकरचे प्रस्ताव द्यावेतज्या गावांसाठी पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे, त्या ग्रामपंचायतींनी पंचायत समितीला तत्काळ प्रस्ताव द्यावेत. प्रस्ताव उशिरा आल्यामुळे हे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठवून त्यांना मंजुरी मिळण्यासाठी उशीर होतो. तालुक्यात दुष्काळावर कशी मात करता येईल, याकडे लक्ष देण्यात आले आहे. येथून पुढे ज्या गावांना टँकरची आवश्यकता आहे, अशा गावातील ग्रामसेवक, सरपंच यांना पंचायत समितीमध्ये बोलावून तत्काळ प्रस्ताव तयार करून घेऊन जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी पाठवून लवकरात लवकर त्या गावांना टँकरनी पाणी पुरवठा करण्यात येईल.- नंदकुमार सोनावले, आंबेगाव पंचायत समिती उपसभापतीसद्य:स्थितीमध्ये तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील कोंढरे, कुशिरे, माळीण, जांभोरी, तळेघर, फलोदे, गोहे सायरखळा, उभेवाडी, बोरीचीवाडी, आमडे, तर पूर्व भागातील वडगाव पीर मांदळेवाडी, निघोटवाडीची दस्तुरवाडी पारगावतर्फे खेड या गावांचे ट्रँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असून, यामध्ये फक्त दोन प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये पारगाव तर्फे खेड या गावासाठी दोन टँकर व माळीण व आमडे या गावासाठी एक टँकर मंजूर झाला आहेत.