अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

By Admin | Updated: December 18, 2014 04:42 IST2014-12-18T04:42:04+5:302014-12-18T04:42:04+5:30

घरात कोणी नसल्याचा फायदा घेत पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून हात व तोंड रुमालाने बांधून अदिवासी कातकरी स

Trial of a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

भोर : घरात कोणी नसल्याचा फायदा घेत पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून हात व तोंड रुमालाने बांधून अदिवासी कातकरी समाजाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना ५ डिसेंबरला आंबवडे (ता. भोर) येथे घडली.
या मुलीच्या आईने फिर्याद दिली असून, आंबवडे गावातच राहणाऱ्या विजू शंकर शेडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे़ अद्याप त्याला अटक झालेली नाही.
याबाबत भोर पोलिसांनी सांगितले की, या मुलीच्या घरातील सर्व जण ५ डिसेंबरला सकाळी ८ वाजता म्हाकोशी (ता. भोर) येथे भातकाढणीच्या कामाला गेले होते. घरात दोन लहान मुलांना सांभाळण्यासाठी ६ वीत शिकणारी १२ वर्षांची मुलगी होती़
हे पाहून दुपारी २
वाजता गावातील विजू शंकर शेडगे हा कुबडी टेकत आला व ताई प्यायला पाणी दे, असे म्हणून त्याने दरवाजाची कडी लावली़ या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला़ त्याच्याविरुद्ध कलम ३(१) १० अंतर्गत कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)

Web Title: Trial of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.