शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लोकांच्या आवडीकडे कलाकारांचा कल वाढतोय : वसंत काब्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 15:02 IST

भारतीय शास्त्रीय संगीत हे ऐकून काय चांगले असते हे कळेल; मात्र गुरुशिवाय ते आत्मसात करता येणार नाही

ठळक मुद्देसवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरील संवादात्मक कार्यक्रम

पुणे : संगीतामध्ये खूप शक्ती आहे, मात्र, त्यामध्ये मन आणि भावना असणे गरजेचे आहे. पूर्वी लोक संगीतासाठी वेडे व्हायचे, लोकांकडे चांगल्या संगीतासाठी वेळ होता. कलाकारांमध्ये आदानप्रदान व्हायचे. आता या गोष्टी बदलल्या आहेत. आता संगीताच्या सुरांतील ताकद संपत चालली आहे. लोकांना जे आवडेल, ते वाजवण्याकडे कल वाढला आहे, असे मत सरोदवादक पंडित बसंत काब्रा यांनी व्यक्त केले. चांगले शिकले पाहिजे. रियाझ केला पाहिजे. स्वत:ला जे आवडेल, तेच वाजवले पाहिजे. ते लोकांना आपोआप आवडू लागेल. भारतीय शास्त्रीय संगीत हे ऐकून काय चांगले असते हे कळेल; मात्र गुरुशिवाय ते आत्मसात करता येणार नाही असेही त्यांनी सांगितले. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये ख्यातनाम कलाकारांबरोबरील संवादात्मक कार्यक्रम म्हणून ओळखल्या जाणा-या ‘अंतरंग’ या कार्यक्रमामध्ये यावर्षी सतारवादक अन्नपूणार्देवी यांचे शिष्य व सरोदवादक पं. बसंत काब्रा यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मंगेश वाघमारे यांनी बसंत काब्रा यांची मुलाखत घेतली. गणेशखिंड रस्त्यावरील राहुल थिएटरजवळील सवाई गंधर्व स्मारकामध्ये सकाळी झालेल्या या कार्यक्रमाला आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी हे देखील उपस्थित होते. काब्रा म्हणाले, ‘घरामध्येच संगीताची परंपरा होती. वडील, काका वाजवायचे. घरी सतत सरोद ऐकू यायची. अली अकबर खॉं यांचे येणे जाणे होते. त्यामुळे पुढे अन्नपूर्णा देवी अर्थात गुरु मॉं यांच्याकडे शिष्य म्हणून दाखल झालो. अन्नपूर्णा देवी यांना संगीत म्हणजे, पूजा वाटायची. त्या म्हणायच्या, राग हे मंत्रासारखे वाजवले, म्हटले पाहिजेत. त्यांचा शिस्तीवर भर होता. अगोदर माहित असलेले सगळे विसरायला अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले आणि पुढे ‘यमन’ रागापासून शिक्षण सुरु झाले.’यावेळी पं. काब्रा यांनी मालकंस, मारवा रागातील काही तुकडे सरोदवर सादर केले. ‘षड्ज’ या कार्यक्रमांतर्गत, दिग्दर्शक एस. बी. नयमपल्ली यांनी दिग्दर्शित केलेला ‘पं. विष्णू दिगंबर पलुस्कर’ हा माहितीपट आणि ‘पं. बिरजू महाराज’, हा चिदानंद दासगुप्ता दिग्दर्शित फिल्म डिव्हिजनने तयार केलेले माहितीपट दाखविण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीतartकला