शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

‘झाड तुमचं, नावही तुमचंच मात्र संगोपन आमचं’; वृक्षसंवर्धनाचा एक अभिनव उपक्रम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 11:57 IST

रानमळा गावात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सामाजिक वनीकरनाचे काम उत्तमरीत्या सुरू

ठळक मुद्देखेड तालुक्यातील रानमळा ग्रामपंचायतीने हाती घेतलेला स्तुत्य उपक्रम रस्त्याच्या दुतर्फा 200 झाडे लावणार रस्त्याच्या दुतर्फा 200 झाडे लावणार रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांची काळजी घेण्यासाठी नेमण्यात आली आहेत माणसेअनेक वृक्षप्रेमी संघटना, संस्था, व्यक्ती यांचा उपक्रमात सहभाग

युगंधर ताजणे पुणे : वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे संत तुकाराम महाराज यांच्या या ओळीला सार्थक रुप देण्याचे काम खेड तालुक्यातील रानमळा ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. वास्तविक बिहार पॅटर्न या नावाने ओळखला गेलेला हा उपक्रम या गावाने आपल्याकडे 'झाड तुमचं, नावही तुमचंच संगोपन मात्र आमचं' या नावाने सुरू केला आहे. 200 झाडे लावण्याचे उद्धिष्ट समोर आहे. अशातच आतापर्यत 39 वृक्षप्रेमी नागरिकांनी 'ट्री गार्ड' देऊन त्यांचा उत्साह वाढवला आहे. रानमळा गावात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सामाजिक वनीकरनाचे काम उत्तमरीत्या सुरू आहे. त्यांनी सुरू केलेल्या रानमळा पॅटर्नची शासनाने देखील इतर गावाने देखील त्यांच्या सामाजिक कामाचे अनुकरण करावे यासाठी दोन 'जी आर' प्रसिद्ध केले आहेत. यंदा या गावातील नागरिक, पर्यावरण प्रेमी यांनी वृक्षसंवर्धनाचा एक आगळा वेगळा उपक्रम समोर आणला आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने प्रत्यक्ष कामास जुलै महिन्यात सुरूवात होणार आहे. या उपक्रमात रस्त्याच्या दोन्ही बाजूला 200 झाडे लावण्यात येणार आहे. त्या झाडाच्या संरक्षणासाठी लागणारे 'ट्री गार्ड' वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी, काही सामाजिक संघटना यांनी उपलब्ध करून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून 200 पैकी 39 झाडासाठी लागणारे ट्री गार्डचा प्रश्न सुटला असल्याची माहिती रानमळा पॅटर्न सुरू करणारे व पर्यावरणप्रेमी पी टी शिंदे गुरुजी यांनी दिली. ते म्हणाले, गावात गेल्या 24 ते 25 वर्षांपासून पर्यावरणाचे आणि सामाजिक वणीकरणाचे काम लोकसहभागातून सुरू आहे. अनेकजण त्यात सहभागी होत आहेत. 

२०० झाडे लावण्याचे उद्धिष्ट आहे. आता ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी यांचा सहभाग लक्षात घेता भविष्यात पुन्हा नवीन 200 झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेऊ असा विश्वास रानमळा गावकऱ्यांना आहे. सध्या दोन प्रकल्प सुरू आहेत. एका माणसाला एका दिवसाला ,28 किलो ऑक्सिजन लागतो .एक झाड एका दिवसात 7 किलो ऑक्सिजन देते. म्हणजेच एका माणसाला रोज 4 झाडे लागतात. 

रोजगार हमी योजनेअंतर्गत या झाडांची काळजी घेण्यासाठी माणसे नेमण्यात आली आहेत. गावातील माणसांना रोजगार मिळावा या उद्देशातून शासन हा उपक्रम हाती घेते. सध्या शहरातून आलेल्या व्यक्तीकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याकडून आर्थिक सहकार्य मिळते आहे. त्या झाडांना कमीतकमी तीन वर्षे पाणी घालणे ,त्यांची निगा राखणे ही सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या ' सामाजिक वनीकरण ' विभागाच्या सहकार्याने रानमळा ग्रामस्थ घेत आहोत .एका ट्री गार्ड चा खर्च अकराशे रुपये इतका आहे. यात अनेक वृक्षप्रेमी संघटना, संस्था, व्यक्ती आपला सहभाग नोंदवत आहेत. याचे समाधान आणि आनंद वाटतो. - पी टी शिंदे ( वनश्री पुरस्कार विजेते, रानमळा पॅटर्नचे निर्माते )

टॅग्स :Khedखेडenvironmentपर्यावरण